Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा'मध्ये येणार लीप, दुरावलेल्या दीपा कार्तिकच्या मुली येतील का एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 18:48 IST

‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे.

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. या मालिकेच्या कथानकात लीप आला असून दीपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्या आहेत. दीपिका आणि कार्तिकी असे या दोघींचे नाव असून आता दुरावलेल्या कार्तिक आणि दीपाला या दोघी एकत्र आणणार का याची उत्सुकता वाढली आहे.

चिमुकल्या दीपिका आणि कार्तिकीला आपण याआधी काही भागांमधून भेटलोच आहे. आता लीपनंतर मोठ्या झालेल्या दीपिका आणि कार्तिकीला २० सप्टेंबरच्या विशेष भागातून भेटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सध्या या दोघींच्या प्रोमोजना भरभरुन प्रतिसाद मिळत असून दोघींची सेटवर खूप छान गट्टी जमली आहे. दीपा आणि कार्तिकही सेटवरच्या या छोट्या दोस्तांना भेटून खुपच खूश आहेत. त्यामुळे मालिकेचे यापुढील भाग अतिशय रंगतदार असणार यात शंका नाही. 

या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या चिमुरडीचे नाव आहे साईशा भोईर. साईशा भोईर ही चाईल्ड मॉडेल आहे. काही नामांकित ब्रँड साठी तिने रॅम्पवॉक केले आहे. साईशा युट्युब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर नेहमी आपले व्हिडीओ अपलोड करत असते. तिच्या या वेगवेगळ्या व्हिडिओंना चाहत्यांकडून पसंती देखील मिळताना दिसते.

टॅग्स :स्टार प्रवाह