Join us
Daily Top 2Weekly Top 5

हर्षदा खानविलकर यांच्यासाठी ऑनस्क्रीन लेकीची पोस्ट, अक्षया म्हणते- "तुझ्यासारखा विचार..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 18:09 IST

विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या हर्षदा खानविलकर यांचा आज वाढदिवस आहे. 

हर्षदा खानविलकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. मराठी टेलिव्हिजनचा त्या लोकप्रिय चेहरा आहेत. कधी कडक सासू तर कधी प्रेमळ आईच्या भूमिकेत त्या दिसल्या. त्यांना सगळ्याच भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी पसंत केलं. पण, 'पुढचं पाऊल'मधली त्यांची भूमिका विशेष गाजली. सध्या त्या 'लक्ष्मी निवास' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या हर्षदा खानविलकर यांचा आज वाढदिवस आहे. 

हर्षदा खानविलकरांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री अक्षया देवधरने खास पोस्ट शेअर केली आहे. अक्षयाने हर्षदा यांच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. "आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, हॅपी बर्थडे ताई. तुझ्यासारखा विचार आणि तुझ्यासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. मी भाग्यवान आहे जे तू माझ्या आयुष्यात आलीस. खूप गप्पा मारू, हसू आणि सोबत कॉफी पिऊ", असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे. 

अक्षया देवधर आणि हर्षदा खानविलकर 'लक्ष्मी निवास' या मालिकेत एकत्र काम करत आहेत. या मालिकेत अक्षया हर्षदा यांच्या ऑनस्क्रीन लेकीची भूमिका साकारत आहे. सध्या मालिका रंजक वळणावर असून सिद्धू आणि भावनाच्या लग्नाची गडबड मालिकेत पाहायला मिळत आहे.

टॅग्स :अक्षया देवधरटिव्ही कलाकार