Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस 17' च्या घरात वकील आणि एक्स क्राइम रिपोर्टरची एन्ट्री, सना खान की जिग्ना वोरा, कोण कोणावर पडणार भारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 22:57 IST

आर्यन खान ड्रग केसमधील वकील सना रईस खान आणि क्राईम रिपोर्टर जिग्ना व्होराने  बिग बॉसच्या घरात दाखल झाल्या आहेत. 

बहुचर्चित 'बिग बॉस १७' चं नवं पर्व अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चाहते शोची वाट पाहत होते. नवीन स्पर्धक, नवे नियम आणि नवीन घर यामुळे बिग बॉसचा हा सीझन खूपच मजेशीर असणार आहे. आर्यन खान ड्रग केसमधील वकील सना रईस खान आणि क्राईम रिपोर्टर जिग्ना व्होराने  बिग बॉसच्या घरात दाखल झाल्या आहेत. 

 ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची वकिल सना रईस खानने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. सना रईस खानने एविन साहूची केस लढवली होती. शिवाय शिना बोरा मर्डर केसमध्येही ती वकिल होती. तर जिग्ना व्होरा क्राईम रिपोर्टर असून तिने मुंबई मिरर, फ्री प्रेस जर्नल आणि मिड डेसाठी काम केले आहे. आपल्या मुलाच्या आग्रहामुळे तिने या शोमध्ये भाग घेण्यास होकार दिल्याचं तिनं सांगितलं. 

 जिग्ना वोरावर छोटा राजनसोबत मिळून पत्रकार जे. डे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. अलीकडेच हंसल मेहताने त्याच्यावर 'स्कूप' नावाची वेबसीरिजही बनवली होती. जिग्ना वोराच्या अटकेची कथा यात दाखवण्यात आली होती. 2011 मध्ये मिड-डे रिपोर्टर ज्योतिर्मय डे यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. जिग्ना वोराने व्यावसायिक वैमनस्यातून जे. डे यांची हत्या करण्यासाठी छोटा राजनला चिथावल्याचा आरोप तपासयंत्रणेने ठेवला. मात्र, तपासयंत्रणा हे सिद्ध करू न शकल्याने न्यायालयाने तिची निर्दोष सुटका केली. 6 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर जिग्ना वोराबाहेर आली. आता या दोघी बिग बॉसचा शो कसा गाजवणार, हे तर येणारा काळच सांगेल.

 

 

टॅग्स :बिग बॉससलमान खानसेलिब्रिटी