Join us
Daily Top 2Weekly Top 5

यश-जुईच्या लग्नानिमित्त तुझ्यावाचून करमेना मालिकेचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 17:43 IST

कलर्स मराठी वाहिनीवरील अस्सं सासर सुरेख बाई मालिकेतील यश आणि जुई येत्या २७ जून रोजी विवाहबद्ध होणार आहे. बहुचर्चित ...

कलर्स मराठी वाहिनीवरील अस्सं सासर सुरेख बाई मालिकेतील यश आणि जुई येत्या २७ जून रोजी विवाहबद्ध होणार आहे. बहुचर्चित असलेला हा विवाह सोहळा देशमुखांच्या कार्यालयात होणार असून सोमण यांचे रुची केटरर्स केटरिंगची जबाबदारी पार पाडणार आहे. तसेच या शुभ प्रसंगी तुझ्यावाचून करमेना मालिकेचा शुभारंभ देखील होणार आहे. या मालिकेत अभिजित आमकर  साई घारपुरे हे मुख्य भूमिकेत पाहायल मिळणार आहे. तर आनंद काळे आणि कविता लाड हे देखील बºयाच कालावधीनंतर एकत्र काम करतांना दिसणार आहे. विघ्नेश जोशी, रुचिरा जाधव, अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर,अभिनेता राजू बावळेकर हे कलाकारदेखील या मालिकेतून झळकणार आहे.