Join us

रसिकांना अखेरचा सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2016 11:58 IST

छोट्या पडद्यावरील 'एक दुजे के वासते' या मालिकेने अल्पावधीतच रसिकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतले काही कलाकार वेळ देऊ ...

छोट्या पडद्यावरील 'एक दुजे के वासते' या मालिकेने अल्पावधीतच रसिकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतले काही कलाकार वेळ देऊ शकत नसल्याने मालिका थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 ऑक्टोबरला या मालिकेचा शेवटचा सीन कलाकारांनी शूट केला. यावेळी मालिकेचे सगळेच कलाकार भावुक झाले होते. अनोळखी कलाकार या मालिकेच्या निमित्ताने एकत्र आले होते आणि त्यांच्यात नवं नातं निर्माण झाले होते. रसिकांनीही या कलाकारांना भरभरुन प्रेम दिले. या मालिकेतील प्रमुख जोडी श्रवण (नमिक पॉल) आणि सुमन (निकीता दत्ता) यांनी रसिकांनी दिलेल्या प्रेमाचे सोशल मीडियावरुन आभार मानले आहेत.