सीआयडी या मालिकेतील दयाला एका दिवसाच्या चित्रीकरणासाठी मिळते इतकी मोठी रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 14:53 IST
सीआयडी ही मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील दया, एसीपी प्रद्युमन या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड ...
सीआयडी या मालिकेतील दयाला एका दिवसाच्या चित्रीकरणासाठी मिळते इतकी मोठी रक्कम
सीआयडी ही मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील दया, एसीपी प्रद्युमन या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. त्यातही द्याची दरवाजावर लाथ मारून दरवाजा तोडण्याची स्टाईल, एसपी प्रद्युमनचे कुछ तो गडबड है द्या असे म्हणणे हे प्रेक्षकांना खूप भावते. ही मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून या मालिकेच्या लोकप्रियतेत थोडादेखील फरक पडलेला नाही. सीआयडी ही मालिका १९९८ साली सुरू झाली होती. या मालिकेत सुरुवातीपासून प्रेक्षकांना दया ही व्यक्तिरेखा पाहायला मिळाली आहे. ही व्यक्तिरेखा दयानंद शेट्टी हा साकारत असून त्याची ही पहिलीच मालिका आहे. दयाला खरे तर स्पॉर्टसमध्ये रस होता. पण खेळताना दुखापत झाल्यामुळे खेळाडू बनण्याचा विचार त्याने सोडून दिला आणि तो अभियक्षेत्राकडे वळला. दयाने गेल्या अनेक वर्षांत जाहिरातींमध्ये, मालिकांमध्ये, रिअॅलिटी शो, चित्रपटांमध्ये काम केले आहे. जॉनी गद्दार, रन वे, सिंघम रिटर्न्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तर गुटर गूँ या मालिकेत खतरो के खिलाडी, झलक दिखला जा यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये तो झळकला आहे. पण आजही त्याची ओळख ही इन्सपेक्टर दया हीच आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचाच हा खूप लाडका आहे. दया या भूमिकेने दयानंद शेट्टीला नाव, पैसा सगळे काही मिळवून दिले आहे. दयाला सीआयडीच्या एका भागासाठी तगडे मानधन मिळते. इतर कलाकारांना दोन-तीन मालिकांमधून मिळणारी रक्कम दयाला त्याच्या एकाच मालिकेतून मिळते. दयाला सीआयडी मालिकेचे एक दिवसाचे चित्रीकरण करण्यासाठी किती मानधन मिळते हे ऐकून तुम्हाला नक्कीच आर्श्चयाचा धक्का बसेल.सीआयडी या मालिकेसाठी एका दिवसाचे चित्रीकरण करण्यासाठी दयाला प्रत्येक दिवसाचे एक लाख रूपये मिळतात असे म्हटले जाते. दया सीआयडी या मालिकेसाठी किती पैसे घेतो याची माहिती इंटरनेटवर नुकतीच व्हायरल झाली आहे. दयाला केवळ एका दिवसासाठी मिळत असलेली ही रक्कम खूपच जास्त आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर सगळ्यात जास्त पैसे घेणाऱ्या कलाकारांमध्ये दयाचा समावेश झाला आहे. Also Read : आणि नृत्य सादर करताना दयाचा पायझमा फाटला