Lapandav Serial: छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनत चालल्या आहेत. या मालिकांमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटतं. अशीच लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे लपंडाव. स्टार प्रवाह वाहनीवरील लपंडाव या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेतील तेजस्विनी आणि मनस्विनी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच रंजक होत असून दुहेरी भूमिका साकारणाऱ्या रुपाली भोसलेच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.
दुहेरी भूमिका साकारणं हे कोणत्याही कलाकारासाठी मोठं आव्हान असतं. याबद्दल रुपाली सांगते,"तेजस्विनी आणि मनस्विनी या दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्तिरेखा आहेत. एकाच दिवशी या दोन्ही भूमिका साकारताना खूप कसरत करावी लागते. दोघींचे लूक, देहबोली,आवाज सगळंच वेगळं ठेवावं लागतं. तेजस्विनीचा लूक अत्यंत क्लासी आणि एलिगंट आहे. तिच्या साड्या, दागिने आणि मेकअपमध्ये एक शाही अंदाज दिसतो. त्याच्या अगदी विरुद्ध मनस्विनीचा लूक साधा आणि नैसर्गिक आहे. मनस्विनी साकारताना ‘नो मेकअप’ लूक ठेवला जातो, त्यामुळे त्या व्यक्तिरेखेत सहजता येते. या दोन्ही भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारल्या जात आहेत की प्रेक्षक प्रत्यक्ष भेटल्यावर तुम्ही खरंच जुळ्या बहिणी आहात का? असा प्रश्न विचारतात. हे कौतुक जितकं आनंद देणारं आहे, तितकंच हे काम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दमछाक करणारंही आहे. मात्र, कलाकार म्हणून मिळणारं समाधान हे सगळ्या मेहनतीचं चीज करतं.
दरम्यान, मालिकेत लवकरच एक धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तेजस्विनीचं अपहरण करण्यासाठी मनस्विनी भांडीवालीचं वेषांतर करणार आहे. रुपालीचा हा नवा अवतार प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे.म्हणूनच, हा थरार आणि नाट्य अनुभवायला विसरू नका. नक्की पाहा लपंडाव दुपारी २ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
Web Summary : Star Pravah's 'Lapandav' features Rupali Bhosle in a dual role. She will disguise herself as a maid to kidnap Tejasswini. This upcoming twist promises high drama and suspense. Watch 'Lapandav' on Star Pravah.
Web Summary : स्टार प्रवाह के 'लपंडाव' में रूपाली भोसले दोहरी भूमिका में हैं। वह तेजस्विनी का अपहरण करने के लिए नौकरानी का भेष धारण करेंगी। आगामी ट्विस्ट में हाई ड्रामा और सस्पेंस का वादा है। स्टार प्रवाह पर 'लपंडाव' देखें।