झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मीनिवास' (Laxminiwas Serial) मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. दळवी कुटुंबाने सिद्धीराज आणि भावनाचे लग्न मान्य केले आहे. पण गाडेपाटील यांना भावना सून म्हणून नको आहे. त्यामुळे सध्या मालिकेत सिद्धीराजला भावनापासून दूर करण्यासाठी गाडेपाटलांचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात सिद्धूने भावनासोबतचे लग्न मोडावे म्हणून आजीने केलेले नाटक सर्वांसमोर उघडकीस येणार आहे.
अखेर सिद्धीराज गाडेपाटील भावनाकडे आपले प्रेम व्यक्त केले आहे आणि त्यानेच तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे दळवी कुटुंब आणि भावना सिद्धूवर खूप नाराज होतात. दुसरीकडे भलेही सभेत गाडेपाटील भावनाचा सून म्हणून स्वीकार करत असले तरी प्रत्यक्षात त्यांचा विरोध आहे. सिद्धीराज दळवी कुटुंबाची नाराजी काढण्यासाठी खूप प्रयत्न करतो. भावनासाठी वटपौर्णिमेचा उपवास करतो. वडाची पूजा करतो. पावसात रात्रभर भिजतो, उपाशी राहतो आणि अखेर दळवी कुटुंबाला लग्नासाठी मनवतो.
मात्र दळवी कुटुंबाने लग्नाला परवानगी दिली असली तरी गाडेपाटलांना भावना सून म्हणून नको आहे. ते सिद्धीराजला विरोध करतात पण तो ऐकत नाही. दरम्यान मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात आजी छातीत दुखत असल्याचं नाटक करते आणि त्यावेळी सिद्धूची आई म्हणते भावनाचा पायगुण चांगला नाही आहे. सगळं तिच्यामुळे होतंय. सिद्धूला आजीचं नाटक लक्षात येतं. त्यावर सिद्धू आजीला आराम करण्याचा सल्ला देतो आणि तिच्या हातावर नकली पाल ठेवतो. ती पाल पाहून आजी आजारपणाचं नाटक विसरून बेडवर उड्या मारू लागते. अशापद्धतीने सिद्धू त्याच्या स्टाईलने आजीची खोड मोडून काढतो.