Join us

'लाखात एक आमचा दादा'मध्ये कालिंदींच्या युक्तिवादाने खटल्याला मिळाला वेग, जालिंदर सापडणार अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 18:33 IST

Lakhat Ek Amcha Dada Serial : 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत गाजत असलेल्या शालन निंबाळकर खून प्रकरणात न्यायालयात खटल्याला अधिकृत सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच दिवशी खटल्याला नवे वळण मिळालंय.

'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Amcha Dada Serial) मालिकेत गाजत असलेल्या शालन निंबाळकर खून प्रकरणात न्यायालयात खटल्याला अधिकृत सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच दिवशी खटल्याला नवे वळण मिळालंय. पीडित पक्षाच्यावतीने काम पाहणाऱ्या प्रसिद्ध वकिल कालिंदी धर्माधिकारी यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपी जालिंदर सरनाईकची बाजू कमकुवत झाली असून, त्याला अटक अवस्थेतच ठेवण्याचे आदेश देण्यात येतात. न्यायालयाने पोलिसांना स्पॉट पंचनामा आणि चार्जशीट लवकरात लवकर दाखल करण्याचे आदेश  दिले आहेत. जालिंदरच्या जामिन अर्जावर सुनावणीदरम्यान, त्याने पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता लक्षात घेता, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

एकीकडे जालिंदर चारही बाजून अडकलेला दिसत आहे, त्यातच  पीडित शालनची मैत्रीण आशा हिने तुरुंगात भेट देऊन जालिंदरला थेट इशाराच दिलाय. स्पॉट पंचनाम्याच्या वेळी पोलिसांनी जालिंदर, मालन, सूर्या आणि तुळजाला घटनास्थळी हजर राहण्यास सांगितले आहे. या वेळी मालनने संपूर्ण घटना पोलिसांसमोर सविस्तर उभी केली. त्याचवेळी एक महत्त्वाचा पुरावा जालिंदरची परफ्यूमच्या बाटलीचा उलगडा होतो. पंचनाम्याच्या वेळी जालिंदर सतत मालनकडे पाहत असल्याचे लक्षात येताच, सूर्या आणि तुळजाला मालनची सुरक्षा धोक्यात असल्याची जाणीव होते. ते तिला आपल्या घरी नेतात. 

मालन- तुळजाची भावनिक भेट

मालन आणि तुळजाच्या भावनिक भेटीने सर्व भारावून जातात. शशिकांत सरनाईक प्रसादला ठार मारण्याची योजना आखतात, परंतु नर्मदाच्या मदतीने प्रसाद पळून जाण्यात यशस्वी होतो. पण त्याचवेळेस त्याचा अपघात होतो, पण योगायोगाने राजूची तिकडे पोहोचून त्याचे प्राण वाचवते. हा खटला आता केवळ एका खुनाचा नसून, अनेक वर्षांपासून दडपून ठेवलेल्या सत्यांचा, नात्यांचा आणि न्यायासाठी सुरू असलेल्या संघर्षाचा झाला आहे.