'लग्नानंतर होईलच प्रेम' ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका. पण, या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक बॅड न्यूज आहे. लोकप्रिय अभिनेत्रीने 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतून एक्झिट घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने याबाबत चाहत्यांना सांगितलं आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत अनिशा हे पात्र साकारणारी अभिनेत्री शिवानी बने हिने मालिका सोडली आहे. "“खारुताईचा” सुंदर आणि सुखकर प्रवास मला संपवावा लागला", असं म्हणत तिने मालिकेच्या सेटवरील काही फोटोही शेअर केले आहेत.
"लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत “अनिशा” ही भूमिका मी साकारली आणि तुमचं प्रेम मला मिळालं. मैत्री करावी तर ती अनिशा आणि काव्यासारखीच असे मेसेज आणि कमेंट्स प्रेक्षकांनी केले, ह्याचं समाधान माझ्यासोबत आमच्या लेखकांनाही मिळालं. तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनिशा असावी अशी माझी ही इच्छा आहे आणि नसेल तर ती नक्कीच मिळेल! आमच्या संपूर्ण टीमला आणि फॅन पेजेसला धन्यवाद. तुमच्यामुळे माझा हा १ वर्षाचा प्रवास खूप छान झाला. असो, पण हा प्रवास जरी संपला असला तरीही मी लवकरच तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे आणि असंच प्रेम मला तुमच्याकडून मिळेल अशी आशा आहे. तुमची खारुताई", असं म्हणत शिवानीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील काव्या आणि अनिशाची मैत्री चाहत्यांना आवडली होती. काव्याच्या सुखदु:खात तिला पावलोपावली साथ देणारी अशी अनिशाची मैत्री होती. मात्र आता अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. सावळ्याची जणू सावली, उदे गं अंबे, आदिशक्ती, सुख कळले मालिकेतही ती दिसली होती. आता तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
Web Summary : Shivani Bane, who played Anisha in 'Lagnalanatar Hoilch Prem,' has left the series. She shared photos and expressed gratitude for the love received during her year-long journey, promising to return soon with something new. Fans loved Anisha and Kavya's friendship.
Web Summary : 'लगनानंतर होइलच प्रेम' में अनिशा की भूमिका निभाने वाली शिवानी बने ने श्रृंखला छोड़ दी है। उन्होंने तस्वीरें साझा कीं और अपनी एक साल की यात्रा के दौरान मिले प्यार के लिए आभार व्यक्त किया, जल्द ही कुछ नया लेकर लौटने का वादा किया। प्रशंसकों को अनिशा और काव्या की दोस्ती पसंद आई।