Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेडी भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली 'ही' अभिनेत्री पुन्हा येतेय रसिकांच्या भेटीला, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 13:21 IST

'लागीर झालं जी' मालिकेत काही कालावधीसाठी जेडीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली ही अभिनेत्री लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील एका मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्देकिरण ढाणे पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडण्यासाठी सज्ज किरण ढाणे दिसणार सोनी मराठी वाहिनीवरील एका मालिकेत

'लागीर झालं जी' मालिकेत काही कालावधीसाठी जेडीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री किरण ढाणे पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार किरण लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील एका मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच तिने सोशल मीडियावर तयार रहा मोठ्या बातमीसाठी असे म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे. 

गेले काही दिवस गायब असणाऱ्या किरणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मी मुंबईसाठी निघाली असून जेव्हा मी बॅकपॅक केली तेव्हा मला टेन्शन आले. मुंबईत येण्यासाठी काय तयारी करावी लागेल हे तुम्ही सांगा, असे किरण म्हणाली आहे.  पण ती मुंबईत नेमकं कशासाठी येणार आहे. हे मात्र सांगितलेलं नाही. तिने आपल्या फॅन्सलाच आपण मुंबईत का येत आहोत हे ओळखायला सांगितलं आहे. त्यामुळे ती लवकरच सिनेइंडस्ट्रीत कमबॅक करणार असल्याचे समजते आहे.

त्यानंतर किरणने आणखी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकला आहे. त्या ती म्हणतेय ‘मी मुंबईत जाण्यासाठी बॅग पॅक केली आहे. पण मला भिती वाटतेय. तर मला तुम्हा प्रेक्षकांची हेल्प हवी आहे. तुम्ही मुंबईत रहात असाल तर मुंबईचे अनुभव शेअर करा. कारण मी पहिल्यांदा मुंबईत रहायला येत आहे.

लागीर झालं जी मालिकेत मानधन न वाढवल्यामुळे किरण ला मालिका सोडावी लागली होती. मात्र या मालिकेत साकारलेल्या जेडीच्या भूमिकेतून तिने रसिकांना चांगलीच भुरळ पडली होती. तिने मालिका सोडल्यामुळे काही प्रेक्षक नाराज झाले होते.सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, किरण लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे आणि तेही सोनी मराठी वाहिनीवरील  प्रमुख भूमिकेत. यावेळेस तिला चांगले मानधन दिले असल्याचेही सूत्रांकडून समजते आहे. मोठी वाहिनी आणि चांगले मानधन यामुळे किरण खूप खुश आहे. किरण कोणत्या वाहिनीवरील मालिकेत आणि कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप समजू शकलेले नाही. पण किरण यावेळी कोणत्या भूमिकेत दिसणार हे जाणून घेणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :लागिरं झालं जीसोनी मराठी