Join us
Daily Top 2Weekly Top 5

'क्योंकी सास भी कभी बहू थी' फेम विकास सेठीचं निधन, पत्नीनं शेअर केली इमोशनल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 11:12 IST

Vikas Sethi Passed Away : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता विकास सेठीचं काल निधन झाले. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीलाच नाही तर चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता विकास सेठी(Vikas Sethi)चं काल निधन झाले. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीलाच नाही तर चाहत्यांनाही धक्का बसला आहे. त्याचे ८ सप्टेंबर रोजी हार्ट अटॅकने निधन झाले. तो ४८ वर्षांचा होता. त्याच्या निधनानंतर आता त्याची पत्नी जान्हवी सेठीनं इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

विकास सेठीचं झोपेत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी त्याच्या निधनाचे कारण हार्ट अटॅक सांगितलं आहे. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. आता विकासची पत्नी जान्हवीने विकासच्या निधनानंतर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

आज होणार विकासच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारजान्हवी सेठीने इंस्टाग्राम अकाउंटवर पती विकासचा फोटो शेअर करत आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगितले आहे. तिने लिहिले की, विकास सेठीच्या प्रेमळ आठवणींमध्ये, अत्यंत दुःखाने आम्ही तुम्हाला कळवत आहोत की, आपला लाडका विकास सेठीचे निधन झाले, जे ८ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या सर्वांना सोडून गेला. ९ सप्टेंबर रोजी हिंदू परंपरेनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या कठीण काळात तुमची उपस्थिती, प्रार्थना आणि पाठिंबा खूप गरजेचा आहे. सेठी कुटुंब."

विकास सेठी वर्कफ्रंटविकास सेठीने २००३ साली ऊप्स सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने अनेक मालिका आणि सिनेमात काम केले आहे. यात क्योंकि सास भी कभी बहू थी, कहीं तो होगा, कसौटी जिंदगी की, उतरन, संस्कार लक्ष्मी, गीत हुई सबसे पराई, दो दिल बंधे एक डोरी से आणि ससुराल सिमर का या मालिकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त तो सुपरहिट चित्रपट कभी खुशी कभी गममध्ये रॉबीच्या भूमिकेत झळकला होता. या भूमिकेतून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. दीवानापन सिनेमातही तो दिसला आहे.