Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्या बात है..!, अभिनेत्री रुपाली गांगुली या मराठी अभिनेत्यामुळे झाली कोट्याधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 12:02 IST

एकेकाळी रुपाली गांगुलीवर फ्लॉप अभिनेत्रीचा टॅग लावण्यात आला होता. तिला कामही मिळेनासे झाले होते.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुपाली गांगुलीचा आज ४४वा वाढदिवस साजरा करते आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. एकेकाळी रुपाली गांगुलीवर फ्लॉप अभिनेत्रीचा टॅग लावण्यात आला होता. तिला कामही मिळेनासे झाले होते. मात्र एका संधीमुळे तिचे नशीब फळफळलं आणि आज ती यशाच्या शिखरावर आहे. त्याचे सर्व श्रेय ती मराठमोळा अभिनेता सुमीत राघवनला देते. 

रुपाली गांगुलीने २००० साली सुकन्या या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने दिल है की मानता नही, जिंदगी तेरी मेरी कहानी, भाभी, काव्यांजली या मालिकांमध्ये काम केले. मात्र यातील एकही मालिका फारशी कमाल दाखवू शकली नाही. त्यामुळे रुपालीवर फ्लॉप अभिनेत्रीचा टॅग लागला गेला. तिला कामही मिळणे बंद झाले होते. त्याच काळात तिने संजीवनी या मालिकेत काम केले. ही मालिका सुपरहिट ठरली पण यात रुपाली सहाय्यक भूमिकेत होती.

पहिल्या चार वर्षात तिने पाच मालिकांमध्ये काम केले. मात्र यापैकी एकही मालिका सहा महिने देखील चालली नाही. दरम्यान साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली आणि तिच्या करियरला कलाटणी मिळाली. 

साराभाई वर्सेस साराभाई ही एक विनोदी मालिका होती. यात तिने अभिनेता सुमित राघवनच्या पत्नीचे काम केले होते. ही मालिका लोकप्रिय ठरली आणि रुपालीच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरली. रुपालीने यापूर्वी कधीच विनोदी मालिकेत काम केले नव्हते. पण सुमितने तिला अभिनय करताना खूप मदत केली. अनेकदा डायलॉग्स पाठ करतानाही तो तिला मदत करायचा. हल्लीच दिलेल्या एका मुलाखतीत रुपालीने या मदतीसाठी सुमितचे आभार मानले होते. जर त्यावेळी सुमितसारखा मित्र नसता तर कदाचित फ्लॉप अभिनेत्रीचा स्टँप कधीच पुसता आला नसता असे ती म्हणाली होती.

त्यानंतर रुपालीने अदालत, परवरीश, आपकी अंतरा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. आज ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. एका मालिकेसाठी ती जवळपास दोन कोटी रुपये मानधन घेते. 

टॅग्स :सुमीत राघवन