Join us

"मी छोटा भीम, तू चुटकी" कुशल बद्रिकेनं श्रेया बुगडेसाठी लिहिली खास कविता, अभिनेत्री कमेंटमध्ये म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 16:20 IST

कुशल बद्रिके आणि अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमधून अनेक विनोदवीर घराघरात पोहचले. यातून अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि अभिनेत्री श्रेया बुगडे(Shreya Bugde) देखील प्रसिद्धीझोतात आले.  या कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, जी आजतागायत कामय आहे.  सध्या हे दोघेही  'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वामुळे चर्चेत आहे. यातच कुशल बद्रिकेने आपल्या खास मात्रिणीसाठी कविता लिहली आहे.  कुशलच्या या विनोदी कवितेवर श्रेयानेही तेवढ्याच गोड आणि विनोदी अंदाजात उत्तर दिले आहे.

कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक मजेशीर कविता पोस्ट केली. "श्रेया बुगडे ह्यांना समर्पित ही दोस्ती वरची कविता" असं म्हणत त्यानं लिहलं,  "मी छोटा भीम, तू चुटकी, मी तुझ्या पेक्षा उंच, तू बुटकी !! तू जेंव्हा समोरून, चालवत येतेस गाडी, माझ मन म्हणत, आली वेडी.. आली वेडी!! मला आवडते खेळायला, फुगडी, मी कुश्या बद्री, तू श्रेया बुगडी !! मी सरळ साधा, तुझ्यात लै मस्ती, अशी आपली दोस्ती, अशी आपली दोस्ती !!"

कविता पोस्ट करताना त्याने शेवटी, "कवी आठवडा भर ठाणे सोडून पळून गेलेत. कृपया त्यांना संपर्क करू नये", असे लिहिले. कुशलच्या या कवितेवर श्रेया बुगडेने कमेंटमध्येच एक कविता लिहून त्याला प्रत्युत्तर दिले आहे. श्रेया बुगडेने कमेंटमध्ये लिहलं, "मी नाही तुझ्यासारखी कविता करण्यात कुशल, पण मला माहितीये तुला आवडतं पाव ‘मिस-ल, ठाऊक आहे हा माझा भाबडा प्रयत्न फसल. कविता नको आपण तेच करू ज्यांनी जग हसल, अशीच ठेवू मैत्री ज्याला कधीच पर्याय नसल".

टॅग्स :कुशल बद्रिकेश्रेया बुगडे