Join us

"आपली मैत्री सुरू झाली ती...", कुशल बद्रिकेनं प्रार्थना बेहरेला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 21:33 IST

Kushal Badrike And Prarthana Behere : अभिनेता कुशल बद्रिके याने प्रार्थना सोबतचे फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) हिचा आज वाढदिवस आहे. तिच्या चाहत्यांसोबत सेलिब्रेटीदेखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तसेच तिला अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) याने प्रार्थना सोबतचे फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कुशल बद्रिकेने प्रार्थनासोबतचे आणि चित्रपटातील कलाकारांसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, आपली मैत्री सुरू झाली ती फोटो साठी उधार घेतलेल्या तुझ्या ट्रॉली बॅग पासून का मग.. लंडनमध्ये तू पाजलेल्या पहिल्या ब्लॅक कॉफीपासून…छे.. छे.. आपली मैत्री सुरू झाली ती, तू दिग्दर्शन करत असलेल्या आणि संजू दादाने डीओपी म्हणून काम केलेल्या “रिल्स” पासून. ज्यात मी, शिवानी सुर्वे, संजय नार्वेकर सर, अभिनय बेर्डे , संजू दादा अशा कलाकारांनी करिअरला जरासं स्टॅच्यू देऊन, आयुष्यातला खरा आनंद शोधला. 

त्याने पुढे म्हटले की, आपल्या सगळ्यांना बांधून ठेवणारा “मैत्रीचा धागा” एखाद्या “दोऱ्याच्या रिळ” मधे नसून “इंस्टाच्या रील” मध्ये आहे हा शोध तुझाच.(वॉव मला काय वाक्य सुचलंय बघ! आत्ता सोबत असतीस तर म्हणाली असतीस ह्यावर काहीतरी रिल करू यार). तुझ्या बाबतीत मला एका गोष्टीचं कायम कौतुक वाटतं तू किती “सोपं” करुन घेतलं आहेस स्वतःला यार. मित्र सोबत असताना मज्जा करणाऱ्या आणि जेव्हा फक्त स्वतः सोबत असतेस तेव्हां जरा जास्त मज्जा करणाऱ्या मैत्रीणे तुला हॅप्पी बर्थडे आणि खूप प्रेम.

टॅग्स :कुशल बद्रिकेप्रार्थना बेहरे