कुमकुम भाग्य फेम शिखा सिंग बनली बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 14:39 IST
कुमकुम भाग्य या मालिकेत आलिया मेहराची भूमिका साकारणारी शिखा सिंग सध्या चित्रीकरणातून ब्रेक घेऊन हॉलिडेवर गेली आहे. चित्रीकरणात सतत ...
कुमकुम भाग्य फेम शिखा सिंग बनली बोल्ड
कुमकुम भाग्य या मालिकेत आलिया मेहराची भूमिका साकारणारी शिखा सिंग सध्या चित्रीकरणातून ब्रेक घेऊन हॉलिडेवर गेली आहे. चित्रीकरणात सतत व्यग्र असल्याने तिला स्वतःला वेळच देता येत नव्हता. पण आता वेळ काढून ती ऑस्ट्रेलियाला गेली आहे. तिने या हॉलिडेचे बिकनी फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केले होते. काही महिन्यांपूर्वीदेखील तिने असेच फोटो पोस्ट केले होते. त्यावेळी ती केरळला गेली होती. तिथल्या बीचवरदेखील तिने बिकनीवर फोटोशूट केले होते. या फोटोची बरीचशी चर्चा झाली होती. शिखा सध्या तिच्या नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियाला गेली आहे. शिखाने 1 मे 2016ला करण शाहसोबत लग्न केले. करण आणि शिखा गेल्या अनेक वर्षांपासून नात्यात होते. इतक्या वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करायचे ठरवले. करण आणि शिखाची भेट एका जिममध्ये झाली होती. जिममध्ये शिखाने व्यायाम करत असताना करणची मदत घेतली होती. त्यानंतर करण तिच्याच बिल्डिंगमध्ये राहात असल्याचे तिला कळले आणि काहीच दिवसांत ते दोघे एकमेकांचे चांगले फ्रेंड्स बनले आणि त्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. करण हा एक पायलट आहे. शिखा आणि करण हे दोघेही वेगवेगळ्या व्यवसायात असले तरी करण तिला खूप समजून घेतो असे ती सांगते. करण आणि शिखा हनिमूनसाठी सध्या ऑस्ट्रेलिया आणि फिजी येथे गेले आहेत. तिथले तिने अनेक फोटो इन्स्टाग्रामला पोस्ट केले असून या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या फोटोंना अनेक लाइक्स आणि कमेंट्सदेखील मिळाल्या आहेत.शिखाने लेफ्ट राइट लेफ्ट, न आना इस देश लाडो, ससुराल सिमर का, फुलगा, मेरी डोली तेरे अंगना आणि महाभारत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.