कुमकुम भाग्य फेम लीना जुमानीचा प्रियकर राहुल सचदेवाने हे काय केले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 12:17 IST
कुमकुम भाग्य या मालिकेत लीना जुमानी तनुश्री ही व्यक्तिरेखा साकारते. तिच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. लीना ...
कुमकुम भाग्य फेम लीना जुमानीचा प्रियकर राहुल सचदेवाने हे काय केले?
कुमकुम भाग्य या मालिकेत लीना जुमानी तनुश्री ही व्यक्तिरेखा साकारते. तिच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. लीना सध्या तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच खूश आहे. कारण लीना आणि राहुल सचदेवा यांचे लग्न ठरले असून ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून येत आहेत. राहुल आणि लीना हे नेहमीच चांगल्या कारणांसाठी चर्चेत असतात. पण आता एका वेगळ्या कारणामुळे राहुल चर्चेत आला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी एका रुग्णालयाच्या आयसीयुची काच रागाच्या भरात तोडली असे एका वेबसाइटने आपल्या बातमीत म्हटले आहे. या वेबसाईटनुसार राहुलच्या विरोधात ही घटना घडल्यानंतर पोलिस तिथे पोहोचले होते. पण रुग्णालयाने राहुलच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल केली नाहीये. हा वाद दोघांनी सांमजस्याने सोडवला असून त्या रुग्णालयाने आपली काचदेखील आता बदललेली आहे. ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वी सकाळच्या वेळात घडली असल्याचे म्हटले जात आहे. लीनाच्या वडिलांना अस्थमाचा अटॅक आला असल्याने त्यांना एका रुग्णायलात दाखल करण्यात आले होते. लीना आणि राहुलसोबतच त्यांच्या घरातील काही मंडळी तिथे उपस्थित होते. लीनाच्या वडिलांची तब्येत खूपच खराब असल्याने त्यांना आयसीयुत भरती करण्यात आले होते. पण ही सगळी मंडळी आयसीयुत जाण्याचा प्रयत्न करत होते. रुग्णायलाच्या नियमानुसार कोणालाही आत जाण्याची परवानगी नाही असे त्यांना रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावर चिडून रागाच्या भरात राहुलने काच फोडली असल्याचे म्हटले जात आहे. तर या सगळ्यावर लीनाने म्हटले आहे की, तिच्या वडिलांची तब्येत खूपच खराब झाली होती आणि त्यामुळे त्यांना सगळ्यांना खूपच टेन्शन आले होते. त्यामुळे अशाप्रकारची घटना घडली.