Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर कुमार सानू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 06:00 IST

‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’ या कार्यक्रमात नामवंत पार्श्वगायक कुमार सानू एक नामवंत परीक्षक म्हणून अलीकडेच सहभागी झाला होते

ठळक मुद्देकुमार सानू यांनी ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ या विलक्षण लोकप्रिय गीताने

‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’ या कार्यक्रमात नामवंत पार्श्वगायक कुमार सानू एक नामवंत परीक्षक म्हणून अलीकडेच सहभागी झाला होते. यावेळी त्याने आपली काही गाजलेली रोमँटिक गाणी गाऊन परीक्षक आणि स्पर्धकांचे मनोरंजन केले. कुमार सानू यांनी ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ या विलक्षण लोकप्रिय गीताने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आणि यावेळी केवळ स्पर्धकच नव्हे, तर परीक्षकही आपल्या या आवडत्या गाण्यावर नृत्य करीत होते.

कुमार सानू म्हणाले, “जगाच्या विविध भागांतून आलेल्या या अतिशय गुणी स्पर्धकांबरोबर मलाही गाता आलं, याचा मला खूप आनंद आहे. मला हा कार्यक्रम अतिशय आवडतो आणि मी त्याचे सर्व भाग पाहिले आहेत. त्यातील सर्व स्पर्धकांची कामगिरी अतिशय चांगली आहे. निर्मात्यांनी या कार्यक्रमाचे भाग आणखी वाढववेत, अशी मी त्यांना सूचना करतो. हिंदी संगीताला जगभरात सन्मानाने सादर करणारा ‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा एकमेव कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील क्षण अन् क्षण मी उपभोगला असून मला पुन्हा एकदा या कार्यक्रमात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.”

‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सरहद्दी पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचं एक संमेलनच भरलेलं असतं. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.

टॅग्स :कुमार सानू