Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:37 IST

बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने यावर भाष्य केलं होतं. तसंच तिच्या लेकानेही कुनिका सदानंद आणि कुमार सानूच्या रिलेशनशिपबद्दल वक्तव्य केलं. आता कुमार सानूचा मुलगा जानू कुनिकावर संतापला आहे. 

Bigg Boss 19: बॉलिवूडची हसीना कुनिका सदानंद 'बिग बॉस १९'ची स्पर्धक आहे. बॉलिवूडमधील करिअरपेक्षा कुनिका तिच्या अफेअर्समुळे जास्त चर्चेत होती. कुनिका आणि बॉलिवूड सिंगर कुमार सानू यांचं अफेअर प्रचंड गाजलं होतं. ते जवळपास ६ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने यावर भाष्य केलं होतं. तसंच तिच्या लेकानेही कुनिका सदानंद आणि कुमार सानूच्या रिलेशनशिपबद्दल वक्तव्य केलं. आता कुमार सानूचा मुलगा जानू कुनिकावर संतापला आहे. 

कुनिकाचा सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तिने इंडस्ट्रीबद्दल भाष्य केलं आहे. ती म्हणते, "मला असं वाटतं की इंडस्ट्रीमध्ये बलात्कार होत नाहीत. तर मुलींकडूनही इशारा असतो. जसं की मी तुमच्याकडे आले आणि तुम्हाला म्हणाले की मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल. हे झालं एक". त्यानंतर कुनिका वेगळे हावभाव करत परत तेच वाक्य म्हणताना दिसत आहे. कुनिकाने केलेलं वक्तव्य पाहून जानू कुमारने अभिनेत्रीला सुनावलं आहे.

या व्हिडीओवर कमेंट करत जानू कुमारने "तिने हेच सगळं आयुष्यभर केलं. विवाहित पुरुष आणि ज्या कोणासोबत करता येईल त्यांच्यासोबत...मला तोंड उघडायचं नाही. नाहीतर तुझं पितळ उघडं पडेल", असं म्हटलं आहे. 

सिनेमासाठी कधीच कॉम्प्रोमाइज न केल्याचंही कुनिकाने या मुलाखतीत सांगितलं होतं. विवाहित दिग्दर्शकासोबत अफेअर असूनही त्यानेही कधी कामासाठी कधी कॉम्प्रोमाइज करायला लावलं नाही. एका निर्मात्याकडून कास्टिंग काऊच करण्याचा प्रयत्न झाल्याचं तिने म्हटलं होतं. 

टॅग्स :बिग बॉस १९कुमार सानूसेलिब्रिटी