Join us

‘या’ अभिनेत्याला डेट करतेय गोविंदाची भाची, ‘बिग बॉस 13’मध्ये फुलणार नवी प्रेमकथा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:23 IST

Bigg Boss 13 : बॉलिवूड अभिनेता गोविंदा याची भाची आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंग सध्या ‘बिग बॉस 13’मुळे चर्चेत आहे.  

ठळक मुद्देआरतीने ‘मायका’ या शोमधून टीव्हीवर डेब्यू केला होता.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याची भाची आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंग सध्या ‘बिग बॉस 13’मुळे चर्चेत आहे.  होय, गोविंदाची भाची आरती सिंग हिला ‘बिग बॉस 13’ची ऑफर मिळाली आहे. दुसरीकडे टीव्हीचा हँडसम हंक सिद्धार्थ शुक्ला याचे नावही कन्फर्म झाले आहे. तो सुद्धा ‘बिग बॉस 13’मध्ये जाणार असल्याचे कळतेय. साहजिकच टीव्ही इंडस्ट्रीचे हे दोन लोकप्रिय चेहरे ‘बिग बॉस’च्या घरात जाणार म्हणून चाहते उत्सुक आहेत.

एकीकडे ‘बिग बॉस 13’मुळे आरती व सिद्धार्थ चर्चेत असताना हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे. चर्चा खरी मानाल तर, आरती व सिद्धार्थ यांचे नाते मैत्रीपेक्षा बरेच पुढे गेले आहे.

दोघांच्या जवळच्या मित्रांना या नात्याची कल्पना आहे. पण आरती व सिद्धार्थ दोघेही हे नाते सीक्रेट ठेवू इच्छितात. त्यामुळे आरतीने सिद्धार्थला डेट करत असल्याच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सांगून फेटाळून लावल्या आहेत. सिद्धार्थपूर्वी आरती ‘दिल मिल गए’ फेम अयाज खानला डेट करत होती. तीन वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पण कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले.

आरतीने ‘मायका’ या शोमधून टीव्हीवर डेब्यू केला होता. उडान, देवो के देव महादेव, वारिश, गृहस्थी, ससुराल सिमर का, उतरन यासारख्या अनेक मालिकांमध्ये दिसणारी आरती सिंह टीव्ही इंडस्ट्रीत एक मोठे नाव आहे. सिद्धार्थचे म्हणाल तर ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या मालिकेतून त्याचा डेब्यू झाला होता. ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख दिली होती. 2014 मध्ये ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातही तो झळकला होता.

टॅग्स :गोविंदाबिग बॉस