Join us
Daily Top 2Weekly Top 5

​या दिग्दर्शकाचे क्रितिका कामरावर होते क्रश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 17:04 IST

कितनी मोहोब्बत है ही मालिका काही वर्षांपूर्वी खूप गाजली होती. या मालिकेतील अर्जुन आणि आरोही या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप ...

कितनी मोहोब्बत है ही मालिका काही वर्षांपूर्वी खूप गाजली होती. या मालिकेतील अर्जुन आणि आरोही या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. त्यांच्यातील केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. या मालिकेत क्रितिका कार्मा आणि करण कुंद्रा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेच्या दरम्यान करण आणि क्रितिका यांच्यात सूत जुळले होते. त्या दोघांचे अनेक वर्षं अफेअर देखील होते. पण काही कारणास्तव त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. आज करण आणि क्रितिका हे कपल नसले तरी त्यांच्यामध्ये खूपच चांगली मैत्री आहे. करण आणि व्हीजे अनुष्का दांडेकर हे आता नात्यात असून क्रितिका तिच्या प्रोफेशनवर लक्ष केंद्रित करत आहे. कितनी मोहोब्बत है या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यानचे एक सिक्रेट नुकतेच या मालिकेचे क्रिएटिव्ह डायरेक्टर विकास गुप्ता यांनी सांगितले आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी क्रितिका, करण आणि विकास यांची खूप चांगली मैत्री जमली होती. ते सेटवर मजा मस्ती देखील करायचे. त्यावेळेच्या त्यांच्या अनेक आठवणी आहेत. विकासने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला विकास, करण आणि क्रितिका तिघेही पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत त्याने एक सिक्रेटदेखील सांगितले आहे. त्याने फोटोसोबत लिहिले आहे की, मला क्रितिकावर क्रश होते, त्यावेळेचा हा फोटो आहे. खरे तर ती मला आजही आवडते. मला ती आवडण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही.विकासने हा फोटो पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या फोटोची चांगलीच चर्चा आहे. Also Read : क्रितिका कामराला आहे या गोष्टीचे व्यसन