Join us

क्रतिकाने दिले निकतिनला सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 13:05 IST

निकतिन धीर सध्या नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत काम करत आहे. मालिकेचे चित्रीकरण हे अनेक तास सुरू असते ...

निकतिन धीर सध्या नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत काम करत आहे. मालिकेचे चित्रीकरण हे अनेक तास सुरू असते आणि त्यातही डेली सोप असल्यास दिवसातून 20 दिवस तरी चित्रीकरण करावे लागते. अशावेळी तब्येत बिघडली तरी चित्रीकरण करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. नागार्जुन या मालिकेत निकेतन प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे मालिकेत अनेक दृश्यांमध्ये तो असतो. गेल्या काही दिवसांपासून त्याला अजिबातच बरे नाहीये. पण तरीही तो एकही दिवस न चुकवता मालिकेचे चित्रीकरण करत आहे. निकतिनच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्याची पत्नी क्रतिका खास त्याच्यासाठी सेटवर डबा घेऊन आली होती. आपल्या पत्नीला सेटवर पाहून निकतिन खूपच खूश झाला. त्याने क्रतिकासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्याचा हा आनंद व्यक्त केला आहे.