Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिस्टिल डिसुझाची 'कुमकुम भाग्य' मालिकेत एंट्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 14:36 IST

चमत्कार आणि अदभुत शक्ती यांचा मेळ असलेली 'ब्रम्हराक्षस – जाग उठा शैतान ही नवी मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येतेय. ...

चमत्कार आणि अदभुत शक्ती यांचा मेळ असलेली 'ब्रम्हराक्षस – जाग उठा शैतान ही नवी मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येतेय. या मालिकेचं प्रमोशनही तितक्या वेगानं सुरु आहे. या नव्या मालिकेची नायिका क्रिस्टिल डिसुझा लवकरच कुमकुम भाग्य या मालिकेत प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहे. या मालिकेत क्रिस्टिल नैना नावाच्या भूमिकेत दिसेल. नैना 'कुमकुम भाग्य' मालिकेतील प्रग्याला आपल्या कारमधून लिफ्ट देणार आहे. या दोघींही आपापल्या जीवनाविषयी गप्पा मारताना पाहायला मिळतील.