Join us
Daily Top 2Weekly Top 5

हनिमूनला गेलेल्या 'ये है मोहब्बतें' फेम अभिनेत्रीने खाल्ली तब्बल १८०० रुपयांची मॅगी, पती म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 18:25 IST

गोव्यात थाटात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.  

'नागिन' आणि 'ये है मोहब्बतें' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केलेली कृष्णा मुखर्जीने काही दिवसांपूर्वी लग्नच्या बेडीत अडकली. कृष्णा मुखर्जीने चिराग बाटलीवालाबरोबर १३ मार्चला लग्नगाठ बांधली. बंगाली आणि पारसी रितवाजानुसार हा विवाहसोहळा पार पडला. गोव्यात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.  

कृष्णा पती चिरागसोबत सध्या हनीमून एन्जॉय करतेय. हनीमून दरम्यानचे अनेक फोटो अभिनेत्री आपल्या सोशल मीडिय अकाऊंटवर शेअर केले आहेत. एके ठिकाणी त्यांनी खाण्यासाठी मॅगीची ऑर्डर दिली होती. या मॅगीची किंमत तब्बल १८०० रुपये इतकी होती. अभिनेत्रीने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला होता. या व्हिडीओत तिचा पती चिराग “१८०० रुपयाची मॅगी खात आहे” असं म्हणताना दिसत होता.

कृष्णा मुखर्जीनेही तिच्या पतीसोबतच्या हनीमूनचे अनेक रोमँटिक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती तिच्या पतीसोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहे. या दरम्यान, अभिनेत्रीने  हातातील चुडा फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

कोण आहे कृष्णाचा पती?अभिनेत्रीच्या पतीबाबत सांगायचे तर, चिराग हा नौदलाचा अधिकारी आहे ज्याच्यासोबत अभिनेत्रीने जवळपास एक वर्ष रिलेशनशीपमध्ये होती. 

टॅग्स :टिव्ही कलाकार