Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोमोलिकाच्या चोळीने जिंकले चाहत्यांचे मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 15:57 IST

‘स्टार प्लस’वरील कसौटी जिंदगी के मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेतील हिना खानचे प्रोमो सादर करून काही आठवडे उलटत नाहीत, तोच तिच्या कपड्यांची चर्चा सुरू झाली आहे.

‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी जिंदगी के’ मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेतील हिना खानचे प्रोमो सादर करून काही आठवडे उलटत नाहीत, तोच तिच्या कपड्यांची चर्चा सुरू झाली आहे. त्यातही कोमोलिकाच्या चाहत्यांमध्ये तिने घातलेल्या चोळ्यांची विशेष चर्चा होताना दिसते आहे. तिच्या चाहत्यांना किती पाहू आणि किती नको, असे झाले आहे. तिने वापरलेल्या चोळ्यांसारख्याच चोळ्यांची मागणी बाजारात वाढली असून ग्राहकांना ते आपल्या साड्यांवर वापरण्याची इच्छा होत आहे. मालिकेची निर्माती एकता कपूरने या प्रोमोपूर्वी कोमोलिकाच्या चोळ्यांच्या डिझाईनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून प्रेक्षकांचे कुतुहल चाळविले होते. त्यानंतर प्रोमोमध्ये पाठ जवळपास उघडी असलेल्या आणि केवळ एकाच दोरीने बांधलेली चोळी पाहून प्रेक्षकांनी तशाच प्रकारच्या चोळ्या शिवण्याचा आग्रह आपल्या शिंप्यांकडे केला होता. यासंदर्भात काही सूत्रांनी सांगितले, “मूळ ‘कसौटी…’ मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारलेल्या उर्वशी ढोलकियाचे कपडे हेही तेव्हा उच्च फॅशनेबल आणि नवे पायंडे पाडणारे म्हणून ओळखले जात होते. आता तिच्या या किर्तीला साजेसे कपडे या नव्या आवृत्तीतील कोमोलिकाकडे असणं गरजेचं होतं. त्यासाठी निर्मात्यांच्या टीमने बरंच संशोधन आणि विचार करून कोमोलिकाच्या कपड्यांची डिझाईन्स तयार केली आहेत. कोमोलिकाचे कपडे आधुनिक असले, तरी प्रेक्षकांचे तिच्या ब्लाऊजवर विशेष लक्ष गेले आहे. कारण आपल्याकडील साडी किंवा लेहेंग्याला साजेसे तिच्यासारखे डिझाईन असलेले ब्लाऊज त्यांना लगेच शिवता येतात. हे ब्लाऊज त्यांना एखाद्या पार्टीत, लग्नात किंवा घरगुती कार्यक्रमात वापरून आपल्या कपड्यांना ग्लॅमरस लूक देता येतो.” कोमोलिकाची बिंदी नव्हे, तर ब्लाऊझ हेच तिच्या फॅशनचे प्रमुख प्रतीक ठरेल अशीच चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2हिना खान