Join us

​जाणून घ्या सुयश टिळकने अक्षया देवधर आणि त्याच्या साखरपुड्याच्या चर्चांबद्दल काय सांगितले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 13:04 IST

सुयश टिळक आणि अक्षया देवधर हे गेल्या कित्येक महिन्यांपासून नात्यात आहेत. ते त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच त्यांचे फोटो ...

सुयश टिळक आणि अक्षया देवधर हे गेल्या कित्येक महिन्यांपासून नात्यात आहेत. ते त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच त्यांचे फोटो शेअर करत असतात. सुयश आणि अक्षयाने त्याच्या नात्याबाबत मौन पाळणेच नेहमी पसंत केले आहे. पण त्या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. सुयशने त्याच्या इन्स्टाग्रामच्या साइटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून या फोटोवरून अक्षया आणि सुयशने साखरपुडा केला असल्याच्या बातम्यांना ऊत आला होता. पण या बातम्या अगदी चुकीच्या असल्याचे सुयशने स्वतः सांगितले आहे. सुयश आणि अक्षयाने साखरपुडा केल्याची बातमी पसरल्यामुळे सुयश आणि अक्षयाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बातम्यांमुळे सुयश चांगलाच चिडला आहे. साखरपुड्याची बातमी कशी पसरली हे त्यालाच माहीत नाहीये. लोकांच्या प्रश्नांना उत्तर देता देता तो कंटाळला आहे.सुयशने त्याच्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना त्याचा आणि अक्षयाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोसोबत सुयशने नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेम, आनंद सगळीकडे पसरवा असे लिहिले होते. या फोटोत अक्षयाच्या हातात एक छानशी अंगठी दिसत होती. ही अंगठी पाहूनच त्या दोघांनी साखरपुडा केला असल्याची चर्चा रंगली होती. अक्षयाच्या हातातील सुंदर अंगठी पाहून तुम्ही साखरपुडा केला असल्याचे आम्हाला वाटत आहे अशा प्रतिक्रिया लोकांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर दिल्या होत्या.तुझ्यात जीव रंगला या मालिकेत अक्षया देवधर अंजलीबाई ही व्यक्तिरेखा साकारत असून तिच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या व्यक्तिरेखेत अंजली बाई आणि राणा यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत असून ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा होते. पण खऱ्या आयुष्यात या अंजलीबाईंची म्हणजेच अक्षयाची जोडी सुयश टिळकसोबत जमली आहे. सुयश आणि अक्षया यांच्या लव्हस्टोरीची सध्या चांगलीच चर्चा आहे. सुयशने का रे दुरावा या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. सध्या तो बापमाणूस या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.  Also Read : सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय बापमाणूस हा हॅशटॅग?