Join us

जाणून घ्या 'द व्हाईस वॉईस सीझन 2'च्या मंचावर कंगना राणौतने का मारली सुगंधाच्या श्रीमुखात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 22:27 IST

बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगणा राणौतचा बिनधास्त आणि बेधडक अंदाज रसिकांनी रुपेरी पडद्यावर विविध भूमिकांमध्ये पाहिला आहे. आपल्या वाटेल ते ...

बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगणा राणौतचा बिनधास्त आणि बेधडक अंदाज रसिकांनी रुपेरी पडद्यावर विविध भूमिकांमध्ये पाहिला आहे. आपल्या वाटेल ते करणारी, मनात येईल ते बिनधास्त आणि कशाची पर्वा न करता रोखठोक बोलणारी कंगणाची भूमिका रसिकांच्या मनात घर करुन गेली आहे. रुपेरी पडद्यावरील बॉलिवूडच्या क्वीनचा हा अंदाज रिलमध्येच नाहीतर रिअल लाइफमध्येही पाहायला मिळतो. रिअल लाइफमध्येही कंगणार बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. फटकळ आणि जे मनात येईल ते मागचा पुढचा विचार न करता कंगणा व्यक्त होत असते. तिच्या याच स्वभावाची अनुभूती नुकतीच सा-यांना आली. निमित्त होतं ते कंगणाच्या आगामी रंगून सिनेमाच्या प्रमोशनचे आणि ठिकाण होते ते द वॉईस इंडिया सीझन-2 या रियालिटी शोचा सेट. रंगून सिनेमाच्या प्रमोशनसाठी या सिनेमाचे कलाकार असलेले अभिनेत्री कंगणा राणौत आणि अभिनेता शाहिद कपूर या शोमध्ये आले होते. यावेळी मोठ्या उत्साहात या स्टार कलाकारांचं मंचावर स्वागत करण्यात आलं. त्यावेळी शोमधील कोच सलीम आणि कोच शान यांनी या शोची होस्ट सुगंधा मिश्रा हिची मस्करी करण्यास सुरुवात केली. त्यांनी सुगंधाला कंगणाची मिमिक्री करण्यासाठी गळ घातली आणि सुगंधा त्यासाठी तयारही झाली. मात्र त्यानंतर सेटवर जे काही घडले ते सारं काही धक्कादायक आणि अनपेक्षित होते. दमदार परफॉर्मन्स आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या कंगणाने सा-यांनाच धक्का देत अनपेक्षित विधान केले. ती म्हणाली की, “मला सुगंधाच्या श्रीमुखात भडकवावी असे वाटत होते”. कंगणाच्या या विधानामुळे सेटवर काही काळ तणावाचं आणि गंभीर वातावरण निर्माण झालं होतं. अचानक कंगणाचे काय बिनसलं, काय नेमकं घडलं याचा अंदाज कुणालाच आला नाही. याआधीही कंगणाच्या रागाचा सुगंधाने अनुभव घेतला आहे. त्यामुळे सुगंधाच्या चेह-यावरही चांगलेच बारा वाजल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंगणा फटकळपणे बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या याच ऍटिट्यूडमध्ये कंगणाने करियरमध्ये यश मिळवलं आहे. मात्र कंगणाचा या सेटवरील हे विधान मात्र सा-यांचीच बोलती बंद करणारं होतं.