Join us

जाणून घ्या 'माझ्या नव-याची बायको' फेम अभिजित खांडकेकरचे 'व्हॅलेंटाइन डे' प्लॅनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 13:01 IST

जीवन सुंदर आहे... हे जीवन सुंदर बनतं ते आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे... या लोकांचं आपल्या जीवनात खास असं स्थान असतं ...

जीवन सुंदर आहे... हे जीवन सुंदर बनतं ते आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे... या लोकांचं आपल्या जीवनात खास असं स्थान असतं त्यामुळं त्याला नाती असं म्हटलं जातं.. याच नात्यांमधून जे दृढसंबंध निर्माण होतात त्यांना नातेसंबंध असं म्हटलं जातं.. ही नाती रक्ताची असतातही नाती भावनिक असतातही नाती प्रेमळ असतात आणि ही नाती तितकीच मैत्रीपूर्णही असतात. आयुष्यातल्या आलेल्या प्रत्येक चढ- उतारवेळी आपली हीच नाती जीवनात अनन्यसाधारण भूमिका निभावतात. 14 फेब्रुवारी म्हटले की आपले आवडते कलाकार मंडळी व्हॅलेंटाइन डे’ च्या दिवशी काय करतातहा दिवस कसा साजरा करणारअसे अनेक प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण होतात. आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारा अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या चाहत्यांसाठीही त्याच्याव्हॅलेंटाइन डे’ विषयी कुतूहल नक्कीच असेल. अभिजीतला या दिवसाविषयी काय वाटतेयंदाचा व्हॅलेंटाइन तो कसा साजरा करणारहे आम्ही त्याच्याकडूनच जाणून घेतलंय.व्हॅलेंटाइन डे विषयी तुझं काय मत आहे?सध्या चांगुलपणा हरवत चालला आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने सर्वांशी आपुलकी आणि प्रेमाने वागत प्रेमाचा, आपलेपणाचा गोड संदेश आपण सगळ्यांना द्यायला हवा असं मला वाटतं. हा दिवस फक्त कपल्सनेच सेलिब्रेट करावा असं नाही तर प्रत्येक नात्यामधला प्रेमाचा गोडवा वाढावा यासाठी या दिवसाचं औचित्य साधायला हवं. प्रेमाचे सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे. मग ते नाते कुठलंही असो. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा व्हॅलेन्टाईन डे असतो. त्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत हा दिवस नक्कीच साजरा करा.  यंदाचा व्हॅलेंटाइन डे तू कशाप्रकारे साजरा करणार?आमच्या लग्नाचा वाढदिवस १ फेब्रुवारीला असतो. त्यामुळे १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी आम्ही व्हॅलेंटाइन वीक सेलिब्रेट करतो. यंदा कामाचं व्यस्त शेड्यूल असल्यामुळे हटके काहीतरी करणं शक्य नसलं तरी एक छानसं प्लेझंट सरप्राईज सुखदाला देणार आहे. हृदयाच्या कप्प्यात कायम राहावा अशा पद्धतीने व्हॅलेन्टाईन डेचे सेलिब्रेशन करणार आहे.  तुझ्या लक्षात राहिलेली व्हॅलेंटाइन डेची एखादी गोड आठवण जाणून घ्यायला आवडेल ?सुखदासोबत आयुष्यात घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे. त्यातल्या त्यात व्हॅलेन्टाईन डे दोघांसाठी स्पेशल ठरावा असा माझा प्रयत्न असतो. प्रत्येक व्हॅलेन्टाईन डे माझ्यासाठी खास आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी मी सुखदासाठी स्वत: स्वयंपाक बनवला होता; तो कितपत चांगला झाला ते माहित नाही मात्र सुखदासाठी तो एक सुखद धक्का होता. तसचं एका व्हॅलेंटाइन डेला आम्ही गेट ऑफ इंडियाला फिरायला गेलो होतो तेथे मी सुखदासाठी एक यॉर्ट बुक केली होती. अथांग समुद्राचं आणि सूर्यास्ताचं विहंगम दृश्य मनात साठवत आम्ही हा दिवस साजरा केला होता. ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मित भय या माझ्या आगामी चित्रपटातील एक रोमँटिक गीत आम्ही क्रुझवर चित्रीत केलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने आम्ही सेलिब्रेट केलेल्या रोमँटिक डेटच्या आठवणीला पुन्हा उजाळा मिळाला.