Join us

‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील ठसकेबाज अक्कासाहेबांचा खऱ्या आयुष्यातील नवरा व मुलगा बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 08:00 IST

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत अक्कासाहेबांची ही भुमिका कोणी साकारलीये माहितीये?

ठळक मुद्दे‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेबद्दल सांगायचं तर या मालिकेमध्ये अभ्या म्हणजेच अभिमन्यू ही भूमिका समीर परांजपे या अभिनेत्याने साकारलेली आहे

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ( Sundara Manamadhe Bharli) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय. या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. लतिका आणि अभ्या यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मालिकेतील अन्य भुमिका साकारणारे कलाकारही तितकेच लोकप्रिय झाले आहेत. मालिकेतील अक्कासाहेबांना तर तुम्ही पाहिलं असेलच.   अक्कासाहेब आणि दौलतची जोडी सतत लतिकाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताना दिसते.  अक्कासाहेबांची ही भुमिका कोणी साकारलीये माहितीये? तर या अभिनेत्रीचे नाव आहे रूपा शिरसाट मांगले. 

रूपा शिरसाट यांना याआधीही अनेक मालिकेत व चित्रपटांत तुम्ही पाहिले असेलच.  आज आम्ही रूपा यांच्या पतीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

रूपा यांनी जितेन मांगले यांच्यासोबत लग्न केलेय. जितेन हे टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर आहेत. त्यांनी एक स्वत:ची मीडिया कंपनी देखील स्थापन केली होती. याचे ते अध्यक्ष होते.  सोशल मीडियावर रूपा आपल्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात.     ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेबद्दल सांगायचं तर या मालिकेमध्ये अभ्या म्हणजेच अभिमन्यू ही भूमिका समीर परांजपे या अभिनेत्याने साकारलेली आहे, तर लतिका ही भूमिका अभिनेत्री अक्षया नाईक हिने साकारलेली आहे.

 

टॅग्स :टेलिव्हिजन