Join us

तू तेव्हा तशी: 'या' गाजलेल्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकलाय चंदू चिमणे; तुम्ही ओळखलं का त्याला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 14:59 IST

Kiran bhalerao: या मालिकेत सौरभ आणि अनामिका यांच्या अव्यक्त प्रेमाची गोष्ट उलगडली जात आहे. यामध्येच सौरभ आणि अनामिका यांच्यासोबत किरण भालेरावचीही भूमिकाही लक्षवेधी ठरत आहे.

झी मराठीवर अलिकडेच 'तू तेव्हा तशी' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेच्या निमित्ताने शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी या जोडीने एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे या मालिकेने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. मात्र, शिल्पा तुळसकर, स्वप्नील जोशी आणि अभिज्ञा भावे या दिग्गज कलाकारांच्या यादीत किरण भालेराव प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. 

या मालिकेत सौरभ आणि अनामिका यांच्या अव्यक्त प्रेमाची गोष्ट उलगडली जात आहे. यामध्येच सौरभ आणि अनामिका यांच्यासोबत किरण भालेरावचीही भूमिकाही लक्षवेधी ठरत आहे. किरण भालेराव याने या मालिकेत चंदू चिमणे ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे चंदू चिमणे ही भूमिका गाजण्यापूर्वीच किरणने एका रिअ‍ॅलिटी शोमधून लोकप्रियता मिळवली आहे.

'तू तेव्हा तशी' या मालिकेत झळकण्यापूर्वी किरण भालेराव 2009 महाराष्ट्राचा सुपरस्टारमध्ये झळकला होता. त्याने पहिल्या पर्वात सहभाग घेतला होता. त्यामुळे त्याची लोकप्रियता या शोपासूनच सुरु झाली होती.

दरम्यान, सध्या किरण तू तेव्हा तशी या मालिकेत सौरभच्या मित्राची भूमिका साकारत आहे. या मालिकेत तो साकारत असलेल्या विनोदी व्यक्तीरेखेमुळे त्याने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. किरणला बालपणापासून अभिनयाची आवड होती. त्यामुळे ही आवड जोपासण्यासाठी त्याने त्याची नोकरी देखील सोडली.  

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारस्वप्निल जोशी