Join us

​किश्वर मर्चंट दिसली बिकनीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 15:38 IST

अनेक कलाकार न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले आहेत. काही जणांनी भारतात राहून न्यू इयरचे सेलिब्रेशन केले तर काही ...

अनेक कलाकार न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले आहेत. काही जणांनी भारतात राहून न्यू इयरचे सेलिब्रेशन केले तर काही जणांनी परदेशात जाऊन धमाल मस्ती केली. किश्वर मर्चंट आणि तिचे पती सुयश राय यांनी देखील त्यांचे न्यू इयर खूपच चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केले असून या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. किश्वर आणि सुयश न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी श्रीलंकाला गेले होते. तिथले अनेक फोटो किश्वरने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत.किश्वरने व्हाइट बिकनी घातलेला तिचा फोटो पोस्ट केला असून या फोटोसोबत तिच्या फॅन्सना नववर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या फोटोत ती वाळूवर झोपलेली असून त्यासोबत लिहिले आहे की, तुम्हाला सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना हे वर्षं आनंदाचे जावो. किश्वर आणि सुयश हे दोघेच श्रीलंकेला गेले नाहीत तर त्यांचे छोट्या पडद्यावरील अनेक मित्र-मैत्रीण देखील त्यांच्यासोबत श्रीलंकेला न्यू इयर एन्जॉय करत आहेत. सरगुन मेहता, आशा नेगी, रित्विक धनजानी हे सगळेच तिथे धमाल मस्ती करत आहेत. किश्वर मर्चंट आणि सुयश रायने दोन वर्षांपूर्वी लग्न केले होते. या दोघांची ओळख प्यार की यह एक कहानी या मालिकेच्या सेटवर झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सहा वर्षांपासून ते दोघे नात्यामध्ये होते. किश्वर ही सुयशपेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे. पण याचा त्यांच्या नात्यावर कधीच परिणाम झाला नाही. ते दोघे बिग बॉस या कार्यक्रमातही आले होते. त्यावेळीदेखील त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. अनेक वर्षांच्या नात्यानंतर किश्वर आणि सुयशने अगदी साध्यापणाने कोर्टात लग्न केले. लग्न धामधुमीत न करण्याचे त्यांनी खूप आधीपासूनच ठरवले होते. पण त्यांनी मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात केला होता. तसेच त्यांच्या इंडस्ट्रीमधील मित्रमैत्रिणींसाठी त्यांनी एक रिसेप्शनदेखील दिले होते. छोट्या पडद्यावरील ही एक क्यूट जोडी मानली जाते.  Also Read : सुयश रायसोबत लग्न झाल्यानंतर अशाप्रकारे माझे आयुष्य बदलले असे सांगतेय किश्वर मर्चंट