क्रितिकाने दिल्या करणला शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:27 IST
करण कुंद्रा आणि क्रितिका कार्मा यांची जोडी कितनी मोहोब्बत है या मालिकेच्यावेळी खूपच प्रसिद्ध झाली होती. याच मालिकेच्या चित्रीकरणाच्या ...
क्रितिकाने दिल्या करणला शुभेच्छा
करण कुंद्रा आणि क्रितिका कार्मा यांची जोडी कितनी मोहोब्बत है या मालिकेच्यावेळी खूपच प्रसिद्ध झाली होती. याच मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्षं ते दोघे नात्यात होते. पण सततच्या उडणाऱ्या खटक्यांमुळे त्या दोघांनी एकमताने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आज ते दोघे नात्यात नसले तरी एकमेकांचे चांगले फ्रेंड्स आहेत. करणच्या आयुष्यात सध्या अनुष्का दांडेकर असून ते दोघे एकत्र फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असतात. करणचा नुकताच वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवसाला ट्विटरवरून क्रितिकानेदेखील शुभेच्छा दिल्या आहेत. क्रितिकाने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, करण तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अनुष्कासोबत तुझा दिवस खूप चांगला साजरा कर.