Join us
Daily Top 2Weekly Top 5

'खरंच तिचं काय चुकलं?'मालिकेत गायत्री सोहम साकारणार नेगेटिव्ह भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 16:15 IST

'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेत दोन सख्ख्या बहिणींची गोष्ट पाहायला मिळणार आहे.

 सोनी मराठी वाहिनी 'खरंच तिचं काय  चुकलं?' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेत दोन सख्ख्या बहिणींची गोष्ट पाहायला मिळणार आहे. भिन्नविभिन्न स्वभावांच्या या बहिणी कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सोबतच  गायत्री सोहम ही अभिनेत्री नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दमयंती या व्यक्तिरेखेत ती दिसणार आहे. दमयंती ही श्रेयसची आई आहे आणि  गायत्री सोहम ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. दमयंतीच्या लूकची चर्चा फार रंगली आहे.

दमयंती ही एक यशस्वी उद्योजिका आहे आणि करारी वृत्ती असलेली अशी तिची व्यक्तिरेखा आहे. नकारात्मक भूमिका असल्यामुळे दमयंतीचा स्वभाव स्वार्थी असणार आहे. काटकारस्थानी आणि अहंकारी असलेली ही व्यक्तिरेखा गायत्री सोहम कशा प्रकारे साकारणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. गायत्री पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

             आभा आणि कुहू यांच्या आयुष्यात दमयंती येण्याने काय बदल होतील आणि श्रेयस कोणाची बाजू घेणार, हे या मालिकेत पाहायला मिळेल. आभा आणि कुहू या भिन्न स्वभावांच्या बहिणी आहेत. दमयंतीने आखलेल्या  कटकारस्थानामध्ये त्या अडकतात का, जर अडकल्या तर त्यातून स्वतःची सुटका  कशा प्रकारे करतील.  दमयंती ही महत्त्वाकांक्षी स्वभावाची आहे. तिच्या आयुष्यातील तिची जी काही ध्येये आहेत ती पूर्ण करण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. आता तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना किती पसंतीस पडते, हे पाहायला मिळेल.

टॅग्स :सोनी मराठी