Join us
Daily Top 2Weekly Top 5

​केतकी माटेगांवकरने गायले प्रेम हे या मालिकेचे शीर्षकगीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 15:46 IST

प्रेम हे ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत प्रत्येक भागात वेगवेगळे कलाकार झळकणार आहेत. प्रेक्षकांना या ...

प्रेम हे ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत प्रत्येक भागात वेगवेगळे कलाकार झळकणार आहेत. प्रेक्षकांना या मालिकेत मोठ्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध चेहरे पाहायला मिळणार आहेत. वैभव तत्त्ववादी, तेजश्री प्रधान, स्पृहा जोशी, वंदना गुप्ते, सिद्धार्थ चांदेकर, प्रथमेश परब असे अनेक कलाकार या मालिकेत झळकणार आहेत. या मालिकेच्या स्टार कास्टप्रमाणेच या मालिकेचे शीर्षकगीतदेखील तितकेच तगडे असावे असे या मालिकेच्या टीमचे म्हणणे होते. त्यामुळे या मालिकेच्या शीर्षक गीतावर खूप मेहनत घेण्यात आली आहे. या मालिकेचे शीर्षक गीत केतकी माटेगांवकर आणि हृषिकेश रानडे यांनी गायले आहे. केतकीने याआधी अनेक चित्रपटांमध्ये गाण्यासोबतच सरस्वती या मालिकेचे शीर्षकगीत गायले आहे. तसेच हृषिकेश हा सारेगामापाचा विजेता असून त्याने अनेक हिट गाणी गायली आहेत. प्रेम हे या मालिकेच्या शीर्षकगीताला निलेश मोहरीर यांनी संगीत दिले असून हे गीत मंदार चोळकरने लिहिले आहे.या मालिकेच्या शीर्षक गीताचे रेकॉर्डिंग नुकतेच करण्यात आले. याविषयी केतकी सांगते, "निलेश मोहरीर हा एक खूप चांगला संगीतकार आहे. त्याचे काम मला खूप आवडते. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव खूप चांगला होता. गायकाला खुलण्यासाठी तो खूप चांगली संधी देतो. प्रेम हे या मालिकेच्या प्रत्येक भागात प्रेक्षकांना नवीन स्टारकास्ट आणि नवीन कथा पाहायला मिळणार आहे. प्रेमकथांवर आधारित या वेगवेगळ्या कथा असणार आहेत. काही प्रेमकथा या तरुण वयातील तर काही मॅच्युअर लव्हस्टोरीज प्रेक्षकांना यात पाहायला मिळणार आहेत. या सगळ्या प्रेमकथांना साजेसे असे या मालिकेचे शीर्षकगीत आहे."