Join us
Daily Top 2Weekly Top 5

केतकी चितळेला झाला होता दुर्मिळ आजार; स्वतःच फोटो शेअर करून दिली होती माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 15:18 IST

वादात सापडण्याची केतकीची ही पहिलीचवेळ नाही. याआधीही केतकी अनेकवेळा वादात सापडली आहे.

अभिनेत्री केतकी चितळे(ketaki chitale)नं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात मोठा वाद सुरू झाला आहे. केतकीच्या पोस्टवरुन सर्वस्तरातून तिच्यावर जोरदार टीका होत आहे. वादात सापडण्याची केतकीची ही पहिलीचवेळ नाही. याआधीही केतकी अनेकवेळा वादात सापडली आहे.तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे ती नेहमीच ट्रोल होताना दिसते. बऱ्याचदा तिचे विचार न करता बेधडक बोलण्याच्या सवयीमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

 केतकी चितळे ही  एपिलेप्सी म्हणजे अपस्मार हा या आजाराने ग्रस्त होती. केतकीने गेल्यावर्षी तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत स्वत: या आजाराबाबत माहिती दिली होती. स्वत:ला या मानसिक आजारातून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या मेडिकल उपचार घेते होती. या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ तिने स्वत: शेअर केले होते. गेल्यावर्षी शेअर केलेल्या या व्हिडिओत ती इलेक्ट्रीक शॉक घेताना दिसली होती. तिचे व्हिडीओ पाहिल्यावर नेटकरी ही हैराण झाले होते. 

याआधी एका शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत क्षुल्लक कारणावरुन भांडण करतानाचा व्हिडिओ देखील तिने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यावरून तिला ट्रोल करण्यात आले होते. अभिनेत्री केतकी चितळे ही मराठी मालिकविश्वातील एक नावाजलेली अभिनेत्री आहे . लक्ष्मी सदैव मंगलम ह्या मालिकेतील तिची भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली होती.

काय सुरु झाला वादकेतकी चितळेनं शरद पवार यांच्याबाबत आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये केतकीनं शरद पवार यांच्या आजारावरून टीका केली होती

 

टॅग्स :केतकी चितळे