Join us

होळीच्या दिवशी सोसायटीमध्ये धिंगाणा, केतकी चितळेचा चढला पारा, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 16:24 IST

Ketaki Chitale lastly was helpless & took help of police, त्या दिवशीही सुरू असलेल्या गोंधळामुळे केतकीला मानसिक आणि शाररिक दोन्ही गोष्टींचा नाहक त्रास झाल्याचे तिने सांगितले आहे.

होळीचा सण सगळेच सोसायटीत साजरे करतात.अगदी त्याचप्रमाणे केतकीच्या सोसायटीत धुळवड साजरी केली गेली.मात्र याच गोष्टीमुळे केतकी जाम वैतागली. होळीच्या दिवशी ढोलताशे वाजवले जात होते. त्यात खूप गोधळ सुरू होता. हा गोंधळ इतका होता की त्याने केतकीची तब्येत खराब झाली.अनेकदा तिने गोंधळ करू नका सांगण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच ऐकून घेत नव्हते.शेवटी तिने पोलिसांना कम्प्लेंट केली.

इतकेच काय तर तर केतकी घरातून एका महिलेला शांतता ठेवा असे सांगायला गेली तर दोघांमध्ये वाद निर्माण झाला.या गोष्टीचा  केतकीला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. केतकीने व्हिडिओ शेअर करत घडलेला प्रकार सांगितला आहे.

लहानपणापासून केतकी एपिलेप्सी आजारानं ग्रस्त आहे.या आजारामुळे जास्त आवाज तिला त्रासदायक ठरतो. त्या दिवशीही सुरू असलेल्या गोंधळामुळे केतकीला मानसिक आणि शाररिक दोन्ही गोष्टींचा नाहक त्रास झाल्याचे तिने सांगितले आहे.

Epilepsy म्हणजे अपस्मार. फिट येणे, आकडी, मिरगी आदी नावांनी हा आजार ओळखला जातो. अपस्मार या आजारात रूग्णाला कोणतीही पूर्वसूचना न मिळता अचानक झटका येतो. हा एक मेंदूशी निगडीत आजार आहे.

टॅग्स :केतकी चितळे