Join us

केकेची भाभीजीच्या घरात एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 14:30 IST

भाभी जी घर पर है या मालिकेत प्रेक्षकांना आता एक नवीन एंट्री पाहायला मिळणार आहे. सीआयडी या मालिकेत काम ...

भाभी जी घर पर है या मालिकेत प्रेक्षकांना आता एक नवीन एंट्री पाहायला मिळणार आहे. सीआयडी या मालिकेत काम करणारा के. के. गोस्वामी या मालिकेत झळकणार आहे. आपल्या मुलीसाठी नवरा शोधणाऱ्या बापाची भूमिका के. के. गोस्वामी साकारणार आहे, पैशाचा हव्यास असल्याने प्रत्येक गोष्टीत काही ना काही तरी मागणी करणारा असा हा आहे. या मालिकेत के. के. गोस्वामी प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. या मालिकेचे संवाद खूप चांगल्याप्रकारे लिहिण्यात आलेले आहे. हे संवाद वाचताना मलाच खूप हसायला येते असे के. के. गोस्वामी सांगतो.