Join us

ताजमहालशी संबंधित ७ कोटींचा जॅकपॉट प्रश्न; स्पर्धकाने खेळ सोडला, तुम्हाला माहितीये का उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:24 IST

केबीसी १७ मध्ये सात कोटींचा जॅकपॉट प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याने स्पर्धकाला खेळ सोडावा लागला. तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर

कौन बनेगा करोडपती १७’ या लोकप्रिय शोमध्ये उत्तराखंडचा आदित्य कुमार हा या सीझनमधील पहिला करोडपती ठरला आहे. त्याने शोमध्ये उत्कृष्ट खेळ करत १ कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले. मात्र अंतिम टप्प्यात आलेल्या ७ कोटींच्या प्रश्नावर त्याने धोका न पत्करता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. आदित्यने खेळताना आत्मविश्वास दाखवला आणि योग्य वेळी लाइफलाइनचा वापर करून अवघड प्रश्नांची उत्तरं दिली. काय होता ७ कोटींचा प्रश्न?

आदित्यने १ कोटी जिंकल्यावर त्याच्यासाठी ७ कोटींचा जॅकपॉट प्रश्न उघडला गेला. हा प्रश्न असा होता की,  “ताजमहाल, सांची स्तूप आणि एलोरा गुहा यांचे चित्रण करणारा जपानी कलाकार कोण होता, जो १९३० च्या दशकात भारतात आला होता?” पर्याय होते – हिरोशिमा सुगिमोटो, हिरोशी सेन्जू, हिरोशी योशिदा आणि हिरोशी नाकाजिमा. हा प्रश्न अत्यंत अवघड असल्याने आदित्यने बराच विचार केला, मात्र त्याला खात्री नसल्यानं त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याने जिंकलेली रक्कम १ कोटी रुपयांवरच थांबली.

हे होतं योग्य उत्तर

आदित्यला उत्तर देता आले नाही. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी त्याला योग्य उत्तर सांगितले, ते होते हिरोशी योशिदा. आदित्यच्या शांत स्वभावाने आणि विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले. धोका पत्करून मोठी रक्कम गमावण्याऐवजी सुरक्षित निर्णय घेऊन त्याने १ कोटी रुपयांसह शोमधून बाहेर पडणे पसंत केले. आदित्यचा हा प्रवास प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला. ज्ञान, संयम आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे असते, हे त्याने दाखवून दिले. आदित्यनिमित्ताने अवघ्या सात दिवसांमध्ये 'केबीसी १७'ला पहिला करोडपती मिळाला

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनटेलिव्हिजनटिव्ही कलाकार