Join us
Daily Top 2Weekly Top 5

KBC 17: शून्य मिनिटांत सोडवला १ कोटींचा प्रश्न, पण ७ कोटींच्या क्रिकेटच्या प्रश्नावर गोंधळला स्पर्धक; तुम्हाला माहितीये उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:43 IST

कौन बनेगा करोडपती १७ मध्ये करोडपती झालेल्या स्पर्धकाने ७ कोटींचा प्रश्न खेळण्याचा निर्णय घेतला. पण उत्तर माहित नसल्याने या स्पर्धकाने खेळ सोडला. तुम्हाला माहितीये का उत्तर?

सध्या 'केबीसी १७'ची चांगलीच चर्चा आहे. या नव्या पर्वामध्ये दुसरा करोडपती मिळाला आहे. बिप्लब बिस्वास हे 'केबीसी १७' मध्ये दुसरे करोडपती झाले आहेत. बिप्लब यांच्या खेळाने अमिताभ इतके प्रभावित झाले की, बिग बींनी बिप्लब यांना घरी जेवणाचं आमंत्रण दिलं. १ कोटी जिंकणारे बिप्लब ७ कोटींच्या प्रश्नावर मात्र काहीसे गोंधळले. क्रिकेटसंबंधी हा ७ कोटींचा प्रश्न काय होता? जाणून घ्या

हा होता ७ कोटींचा प्रश्न

१ कोटी रुपये जिंकल्यानंतर बिप्लब ७ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सज्ज झाले. ७ कोटींसाठी त्यांना विचारण्यात आलेला प्रश्न क्रिकेटशी संबंधित होता. तो प्रश्न पुढीलप्रमाणे- "भारतीय क्रिकेट संघामध्ये फिरकी गोलंदाजांचं एक चौकुट आहे. त्याच्या ५० वर्ष आधी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघात फिरकी गोलंदाजाचं एक चौकुट होतं. त्यामध्ये खालीलपैकी कोणता फिरकी गोलंदाज सहभागी नव्हता?" पर्याय होते: A) रेगी श्वार्ट्झ, B) ऑब्रे फॉकनर, C) जिमी सिंक्लेअर, D) गॉर्डन व्हाईट.

बिप्लब यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर ठाऊक नव्हते आणि त्यांच्याकडे कोणतीही लाइफलाइन शिल्लक नव्हती. १ कोटी ही मोठी रक्कम असल्याने कोणतीही जोखीम न पत्करता त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. खेळ सोडल्यानंतर जेव्हा त्यांना एका पर्यायाचा अंदाज लावण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी 'गॉर्डन व्हाईट' असे उत्तर दिले, जे उत्तर चुकीचं होतं. या प्रश्नाचे योग्य उत्तर 'जिमी सिंक्लेअर' (Jimmy Sinclair) हे होते.

१ कोटींचा प्रश्न काय होता?

अमिताभ बच्चन यांनी बिप्लब बिस्वास यांना १ कोटी रुपयांसाठी विचारलेला प्रश्न असा होता: "स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला फ्रान्समधून अमेरिकेत पोहोचवणाऱ्या जहाजाचे नाव काय होते?" या प्रश्नाचे उत्तर बिप्लब यांनी कोणतीही लाइफलाइन न वापरता आणि वेळ न घालवता क्षणात 'इसेरे' (Isère) असे दिले. केवळ जहाजाचेच नाही, तर ते जहाज चालवणाऱ्या खलाशाचे नावही त्यांना माहीत होते, हे ऐकून बिग बींनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. हे उत्तर बरोबर असल्याने बिप्लब यांनी १ कोटी रुपये जिंकले

English
हिंदी सारांश
Web Title : KBC 17: Crorepati Quickly Solves ₹1 Crore Question, Stumbles on ₹7 Crore Cricket Question

Web Summary : KBC 17's second crorepati, Biplab Biswas, impressed Amitabh Bachchan. He quickly answered the ₹1 crore question about the Statue of Liberty's ship. However, a ₹7 crore cricket question stumped him, leading him to quit the game.
टॅग्स :अमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपतीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार