Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी जयाला फिरायला नेता का? स्पर्धकाच्या प्रश्नावर बिग बी हसतच म्हणाले, "ती संसदेत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 15:57 IST

युपीचे अश्विन हॉटसीटवर बसले असता बिग बींनी त्यांच्यासोबत मजामस्ती केली.

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यात वयाच्या ८० व्या वर्षीही कमालीचा उत्साह आहे. सिनेमाचं शूट असो किंवा जाहिरातीचं ते अगदी मन लावून काम करतात. सध्या बिग बी 'केबीसी' शोमध्ये व्यस्त आहेत. अनेक वर्षांपासून ते केबीसीचं सूत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे स्पर्धकही अगदी दिलखुलास बोलतात. अनेकदा स्पर्धक आणि अमिताभ बच्चन यांच्यात असा संवाद होतो ज्यामुळे एकच हशा पिकतो. 

'कौन बनेगा करोडपती'चा १५ वा सिझन नेहमीप्रमाणेच प्रेक्षकांचं मन जिंकतोय. युपीचे अश्विन हॉटसीटवर बसले असता बिग बींनी त्यांच्यासोबत मजामस्ती केली. दरम्यान अश्विनच्या पत्नीने बिग बींकडे पतीविरोधात तक्रार केली. ती म्हणाली, 'यांना माझ्या हातचा स्वयंपाक आवडत नाही. ते मला कुठेही बाहेर घेऊन जात नाहीत. तसंच काही गिफ्टही देत नाहीत.'

पत्नीची तक्रार ऐकताच अश्विनने बिग बींनाच विचारले की घरी तुमच्यासोबतही असंच होतं का? तुम्ही तुमच्या पत्नीला बाहेर फिरायला घेऊन जाता का?' स्पर्धकाच्या या प्रश्नावर बिग बींना हसू आलं. ते म्हणाले, 'माझी पत्नीही काम करते. जोपर्यंत मी घरी पोहोचतो तोवर ती संसदेत गेलेली असते. म्हणून मी वाचतो.'

केबीसी शो गेल्या अनेक वर्षांपासून गाजतोय. अमिताभ बच्चन यांची शुद्ध हिंदी भाषा ऐकून प्रेक्षक कायम अवाक होतात. तसंच स्पर्धकांची खेचण्यातही बिग बी पटाईत आहेत. स्पर्धकही अनेकदा महानायकाची खेचताना दिसतात.

टॅग्स :अमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपती