Join us
Daily Top 2Weekly Top 5

'काव्यांजली - सखी सावली' उत्कंठावर्धक वळणावर, अंजलीचं स्थळ कोणाशी जुळणार - सुजित की प्रितम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 16:25 IST

Kavyanjali : 'काव्यांजली - सखी सावली' मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. काव्या आणि अंजली या बहिणींच्या जोडीला चांगलीच पसंती मिळते आहे.

कलर्स मराठीवरील 'काव्यांजली - सखी सावली' मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. काव्या आणि अंजली या बहिणींच्या जोडीला चांगलीच पसंती मिळते आहे. या दोघी बहिणींची जीवनशैली जरी अगदी विरुद्ध असली तरी विविध आव्हानातून त्या एकमेकींना साथ देतात. 

आतापर्यंत आपण पाहिलं, काव्याने अंजलीसाठी स्थळ बघितले आहे ही गोष्ट काव्या अंजलीला सांगते. पण अंजलीचं प्रितमसोबत नाही तर सुजीतसोबत लग्न ठरतंय ही गोष्ट अंजलीला माहित नसते. काव्याने तिला स्थळाबद्दल सांगितल्यावर तिला वाटते तीच लग्न प्रितमसोबत होणार आहे आणि म्हणून ती होकार देते. हे ऐकून काव्यादेखील आनंदी होते आणि गोष्टी पुढे नेते. काव्या घरी येऊन मिनाक्षी आणि निरंजनला सांगते की उद्या अंजली आणि सुजीतच्या लग्नाची बोलणी करायची आहे पण मिनाक्षीला हे मान्य नसते. 

अंजली जेव्हा कार्यक्रमासाठी तयार होऊन बाहेर येते तेव्हा तिला समोर सुजीत आणि प्रितम दोघेही दिसतात आणि दोघांना बघून ती गोंधळते. जेव्हा तिला कळेल की तिचं लग्न प्रितम नाही तर सुजीतसोबत ठरतंय तेव्हा अंजलीच्या मनावर काय परिणाम होईल? हे सत्य कळल्यावर ती कशी रिऍक्ट करेल? हे पाहण्यासाठी 'काव्यांजली - सखी सावली' मालिका पाहावी लागेल.