जमशेदपूरच्या अनामिका मुजुमदार बनल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनच्या पहिल्या करोडपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 12:40 IST
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा नववा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनमधील सगळेच भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडत ...
जमशेदपूरच्या अनामिका मुजुमदार बनल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनच्या पहिल्या करोडपती
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा नववा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनमधील सगळेच भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या कार्यक्रमातील अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. हा सिझन सुरू होऊन आता जवळजवळ एक महिना झाला आहे. या सिझनमध्ये आतापर्यंत ५० लाखापर्यंतची रक्कम स्पर्धकांनी जिंकली आहे. पण पहिल्यांदाच या सिझनमध्ये एक करोडची रक्कम एका स्पर्धकाने जिंकली आहे. ही स्पर्धक एक महिला असून जमशेदपूरला राहाणाऱ्या अनामिका मुजुमदार यांनी या सिझनचा पहिला करोडपती होण्याचा मान पटकावला आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या चित्रीकऱणाला उपस्थित असलेल्या लोकांच्या मते अनामिका मुजुमदार या सुरुवातीपासूनच खूप छान खेळत होत्या. त्यांच्यातील आत्मविश्वास सुरुवातीपासूनच दिसत होता. त्या चांगली रक्कम जिंकतील असे प्रत्येकालाच वाटत होते आणि त्यांनी सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तर देत एक करोड रुपये जिंकले. एक करोड जिंकल्यानंतर त्यांना झालेला आनंद त्या शब्दांत व्यक्त करू शकत नव्हत्या. त्या खूपच खूश झाल्या होत्या. एक करोड जिंकल्यानंतर त्यांना सात करोडसाठी पुढचा प्रश्न विचारण्यात आला. पण उत्तराच्या बाबतीत त्या द्विधा मनस्थितीत अडकल्या होत्या. त्यामुळे कोणतीही रिस्क घेण्याऐवजी त्यांनी कार्यक्रम सोडणे पसंत केले आणि एक करोड घेऊन त्या कार्यक्रमातून बाहेर पडल्या.अनामिका मुजुमदार या समाजसेविका असून त्या एक एनजीओ चालवतात. त्यांच्या एनजीओचे नाव फेथ इन इंडिया म्हणजेच फिमेल ओरा इनिशियिटेड टूवर्डस होप असे आहे. जमशेदपूर, झारखंड येथील छोट्या-छोट्या गावांमध्ये अनामिका यांचे एनजीओ काम करते. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात एक करोड रुपये जिंकल्यानंतर हे पैसे मी माझ्या एनजीओच्या कामासाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोरेगाव फिल्म सिटी मधील कौन बनेगा करोडपतीच्या भव्य सेटवर या कार्यक्रमाचे नुकतेच चित्रीकरण करण्यात आले. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये हर्षवर्धन नवाठेने सगळ्यात पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला होता. Also Read : अमिताभ बच्चन यांचे केवळ २५ टक्के लिव्हरच कार्यरत