कतरिना, आलियाला पछाडणा-या निया शर्माने पुन्हा केले हटके फोटोशूट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 16:41 IST
सध्या ''आज मै उपर आसमाँ निचे आज मै आगे जमाना है'' पिछे अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे टीव्ही अभिनेत्री ...
कतरिना, आलियाला पछाडणा-या निया शर्माने पुन्हा केले हटके फोटोशूट?
सध्या ''आज मै उपर आसमाँ निचे आज मै आगे जमाना है'' पिछे अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे टीव्ही अभिनेत्री निया शर्मा हिची.नियाने नुकताच आशियातील सर्वात सेक्सी महिलांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे. या यादीत कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि सोनम कपूर सारख्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींना तिने मागे टाकले आहे. सर्वात सेक्सी महिलेचा किताब आपल्या नावी करणा-या नियाने आणखी एक हटके फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील नियाचा अंदाज प्रत्येकाला घायाळ करणारा आहे. नियाने या फोटोशूटची झलक तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. या फोटोशूटमध्ये नियाचा मादक अंदाज लक्षवेधी ठरत आहे.काही महिन्यांपूर्वी एका अवॉर्डशोमध्ये निया अतिशय मादक रुपात अवतरली होती.या अवॉर्डशोमध्ये नियाने परिधान केलेला ड्रेसिंग स्टाइलमुळे ती अधिक हॉट दिसत होती. याच लूकमध्ये या अवॉर्डशोमध्ये पोहोचल्यानंतर नियाची चर्चा सुरू झाली होती.पण त्याचबरोबर ती सोशल मीडिया अकाऊंटसवरही तिचे रोजचे बिनधास्त फोटो शेयर करत असते.निया शर्माने काली-एक अग्निपरीक्षा या मालिकेद्वारे तिच्या छोट्या पडद्यावरील करियरला सुरुवात केली. त्यानंतर तिने बहने, एक हजारों में मेरी बहेना है या मालिकांमध्ये काम केले. या तिच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.द प्लेयर या रिअॅलिटी शोमध्येदेखील निया झळकली होती. नियाने 'जमाई राजा' या मालिकेत रोशनी खुराना या भूमिकेच्या माध्यमातून घराघरातं पोहचलेली निया सध्या 'कॉमेडी नाईटस बचाव ताजा' या नव्या पर्वातही ती रसिकांना कॉमेडी स्कीट करत फुल ऑन मनोरंजन करत आहे.