Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृतिका कामरा बनणार लढाऊ राजकन्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 16:45 IST

‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ मालिकेत राजकन्या चंद्रकांताची भूमिका साकारणा-या कृतिका कामराने आपल्या मादक परंतु रूपसुंदर रंगभूषेमुळे सर्वांचे लक्ष वेधून ...

‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ मालिकेत राजकन्या चंद्रकांताची भूमिका साकारणा-या कृतिका कामराने आपल्या मादक परंतु रूपसुंदर रंगभूषेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता ती एका नव्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे.चंद्रकांता आता युध्द लढणार असून राजसिंहासनावरही बसणार असल्याने निर्मात्यांनी तिला काहीसा धाडसी, चंद्रकांता ही विजयगढ राज्याची राजकन्या असून आपले वडील जयसिंह (हर्ष वशिष्ठ) यांच्या अनुपस्थितीत ती राज्याची जबाबदारी स्वीकारून ती त्याच्या रक्षणासाठी योध्दाही बनणार आहे.यापूर्वी कृतिकाला हलका गुलाबी, तांबूस किंवा आकाशी अशा हलक्या रंगांची रंगभूषा केली जात होती. तसेच तिच्या डोक्यावर मुकुटही होता. आता मालिकेचे कथानक जसे पुढे सरकेल, तशी कृतिका लढाऊ पोषाखात दिसणार आहे. “एकाच व्यक्तिरेखेत इतक्या विविध छटा तुम्हाला सहसा पाहायला मिळत नाहीत, त्याही टीव्ही मालिकांमध्ये. पण ‘चंद्रकांता’ने मला आतापर्यंत ब-याच गोष्टी शिकविल्या आहेत. काहीतरी नवी आणि आव्हानात्मक भूमिका साकारायला मिळेल, या हेतूने मी ही मालिका स्वीकारली होती. माझी ही इच्छा तर पूर्ण झालीच, शिवाय मी त्यापेक्षाही अधिक गोष्टी शिकायला मिळाल्याचे कृतिका कामराने सांगितले. तसेच  चंद्रकांताची भूमिका साकारणारी कृतिका कामराने तिच्या भूमिकेसाठी निरूशा निखतने कृतिकाचे कॉस्च्युम डिझाईन केला आहेत. कृतिका मालिकेत जितकी सुंदर दिसते तितकीच सुंदर ती रिअल लाईफमध्येही दिसते.कृतिका ऑनस्क्रीन लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते तसेच  ऑफस्क्रीन क्लिक केलेल फोटो ती सोशल मीडियावर अपलोड करत असते. ती सतत सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही दिवसें दिवस वाढ होत आहे.