Join us

'रंग माझा वेगळा'मधील कार्तिकी उर्फ साईशा भोईरनं मालिका सोडल्यानंतर तिचा व्हिडीओ आला चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:55 IST

कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या साईशा भोईर (Saisha Bhoir) हिने नुकतीच 'रंग माझा वेगळा' मालिका सोडली आहे.

मराठी टेलिव्हिजनवरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका महाराष्ट्रातली नंबर वन मालिका ठरली आहे. या मालिकेतील दीपा आणि कार्तिकची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली. त्यानंतर आता या मालिकेतील दोन चिमुरड्या म्हणजेच कार्तिकी आणि दीपिका देखील आपल्या निरागस अभिनयाने घराघरात पोहचल्या आहेत. कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या साईशा भोईर (Saisha Bhoir) हिने नुकतीच मालिका सोडली आहे. या मागचे कारणदेखील तिने सांगितले आहे. मालिकेतून निरोप घेतल्यानंतर साईशा सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. तिचे सोशल मीडियावरील व्हिडीओ चर्चेत आले आहेत. 

साईशा भोईर युट्युब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर नेहमी आपले व्हिडीओ अपलोड करत असते. तिच्या या वेगवेगळ्या व्हिडिओंना चाहत्यांकडून पसंती देखील मिळताना दिसते. मालिका सोडल्यानंतर आता साईशा सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. तिने सँडविच बनवतानाचा व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

साईशा भोईर ही चाईल्ड मॉडेल आहे. काही नामांकित ब्रँड साठी तिने रॅम्पवॉक केले आहे. साईशा आणि तिचे कुटुंब कल्याणला वास्तव्यास आहे. तिचे वडील विशांत भोईर यांना म्युजिकची आणि ट्रॅव्हलिंगची आवड आहे. मालिकेत साईशाला तिचे चाहते खूप मिस करत आहेत. 

रंग माझा वेगळा मालिकेत साईशाच्या जागी आता लवकरच बालकलाकार मैत्रेयी दाते भेटीला येईल. मैत्रेयीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे. मैत्रेयीची ही आवड लक्षात घेऊन तिच्या पालकांनी अभिनय अकादमीमध्ये तिचा प्रवेश घेतला. मैत्रेयीने बऱ्याच जाहिराती आणि बालनाट्यांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच मैत्रेयी शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेत असून तिला चित्रकलेचीही आवड आहे.