Join us

करिश्मा तन्नाने मालदीवमध्ये असा साजरा केला 36 वा वाढदिवस, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 13:06 IST

करिश्मा तन्ना 36 व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ती मालदीवला गेली होती. या हॉलिडेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

करिश्मा तन्ना सध्या मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. करिश्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती बिकिनी तर कधी स्विमसूट परिधान करत मस्त पुलमध्ये चील करताना दिसते आहे. नुकताच तिचा वाढदिवस झाला. 36 व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ती मालदीवला गेली होती. या हॉलिडेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

 2000 पासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करत असून करिश्मा तन्नाने आजवर 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'कही तो मिलेंगे', 'देस में निकला होगा चाँद', 'शरारत', 'कुसूम' 'जोर का झटका', 'कॉमेडी नाइट्स विद कपिल', 'बिग बॉस 8', 'नच बलिए 7' आणि 'फियर फॅक्टर : खतरों के खिलाड़ी 7' मध्येही दिसली आहे. 

तिच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. तिच्या या हॉलिडे फोटोंमुळे तिने पुन्हा एकदा रसिकांचे लक्ष वेधले आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे तिच्या ऑफस्क्रीन लुकलाही रसिकांची चांगली पसंती मिळत आहे. नेहमीच ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चाहत्यांची वाहवा मिळवत असते.  त्यामुळे इन्स्टाग्रामवर तिला 2.9 मिलियन फॉलोवर्स आहेत. तुर्तास तिच्या या व्हॅकेशन मोड फोटोंनाही सोशल मीडीयावर चांगलीच पसंती मिळत आहे.

     

टॅग्स :करिश्मा तन्ना