Join us

​करिश्मा कपूर आणि गोविंदा अनेक वर्षांनी एकत्र झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 16:55 IST

गोविंदा आणि करिश्मा कपूर ही नवव्दीच्या दशकातील सगळ्यात सुपरहिट जोडी होती. या जोडीने कुली नं. १, राजा बाबू, दुल्हारा, ...

गोविंदा आणि करिश्मा कपूर ही नवव्दीच्या दशकातील सगळ्यात सुपरहिट जोडी होती. या जोडीने कुली नं. १, राजा बाबू, दुल्हारा, हसिना मान जायेंगे, खुद्दार, राजा बाबू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. या दोघांची जोडी म्हटली की, चित्रपट हिट होणारच असे म्हटले जात असे. गोविंदा आणि करिश्मा यांची जोडी प्रेक्षकांना २००० ला शिकारी या चित्रपटातही पाहायला मिळाली होती. या चित्रपटात प्रेक्षकांना गोविंदाचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला होता. पण गेल्या काही वर्षांपासून करिश्माने चित्रपटांमध्ये काम करण्याचे प्रमाण खूप कमी केले आहे. तसेच गोविंदा देखील प्रेक्षकांना खूपच कमी चित्रपटांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे प्रेक्षकांना कित्येक वर्षांत ही जोडी रूपेरी पडद्यावर पाहायला मिळालेली नाही. पण आता करिश्मा आणि गोविंदा यांच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. आता ते दोघे प्रेक्षकांना एका कार्यक्रमात एकत्र पाहायला मिळणार आहेत.डान्स प्लस या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा झाली होती. या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे नृत्य प्रेक्षकांना आवडले होते आणि आता याच कार्यक्रमाचा मेन्टर रेमो डिसोझा प्रेक्षकांसाठी डान्स चॅम्पियन हा कार्यक्रम घेऊन आला आहे. या कार्यक्रमात एकाहून एक सरस नृत्य प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमाच्या एका भागात खास परीक्षक म्हणून गोविंदा आणि करिश्मा कपूर हजेरी लावणार आहेत. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले. या कार्यक्रमात ते दोघे त्यांच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांवर थिरकताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राजा बाबूमधील आजा आजा या गाण्यावर देखील ते नृत्य सादर करणार आहेत. गोविंदा आणि करिश्मा यांनी या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या वेळी खूप सारी मजा मस्ती केली असे म्हटले जाते. एवढेच नव्हे तर गोविंदा हा नेहमीच त्याच्या उशिरा येण्यावरून ओळखला जातो. पण त्याच्या लाडक्या सहकलाकारासाठी म्हणजेच करिश्मासाठी तो एकदम वेळेत आला होता. Also Read : जया बच्चन करिश्मा कपूरल्या असे काय म्हणाल्या, जे ऐकून अभिषेक बच्चनने मोडला साखरपुडा ?