Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिश्मा तन्नाला योगा करताना झाली दुखपात, करावी लागली सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 14:21 IST

डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

अभिनेत्री करिश्मा तन्ना गेल्या काही दिवसांपासून घरात आराम करते आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्ट नुसार करिश्माला दुखापत झाली आहे. दुखापत ऐवढी वाढली की तिला सर्जरी करावी लागली. करिश्माने तिच्या फॅन्ससोबत अंगठ्याला झालेल्या सर्जरीचा फोटो शेअर केला.  पायाच्या दुखण्यामुळे करिश्माला रात्रीची झोप येत नसल्याचे तिने सांगितले आहे.

रिपोर्टनुसार काही दिवसांपूर्वी नवी योगासन करताना करिश्माला दुखापत झाली होती. योगा करताना करिश्माचा बॅलेनस गेला होता आणि पायाला आणि खांद्याला दुखापत झाली होती. परिणामी डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 

नागीन'आणि 'कयामत की रात' या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना हे नाव लोकप्रिय झाले. यानंतर रणबीर कपूरच्या 'संजू'मध्ये तिला संधी मिळाली. इन्स्टाग्रामवर स्वत:चे एकापाठोपाठ एक असे अनेक हॉट फोटो ती शेअर करत असते.

करिश्मा तन्नाने आजवर 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'कही तो मिलेंगे','देस में निकला होगा चाँद', 'शरारत', 'कुसूम' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. 'कयामत की रात'मधली तिची राणीची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडली होती. करिश्माने २०१३ साली ' ग्रॅंड मस्ती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत.

टॅग्स :करिश्मा तन्ना