Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिना- अनुष्कानंतर ही अभिनेत्रीही बनणार आई, स्टायलिश अंदाजात बेबी बंम्प केला फ्लॉन्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 15:56 IST

अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी २०१३ साली रेशीमगाठीत अडकले होते. दोघांचा प्रेमविवाह होता.अनिता आणि रोहित रेड्डी दोघांची पहिली भेट जीममध्ये झाली होती.

कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या करिना आणि अनुष्काप्रमाणे टीव्ही अभिनेत्री अनिता हंसनंदानीच्या घरातून ऐकायला मिळतायेत. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.अनितानेही पती रोहित रेड्डीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले, ''पती, पत्नी और ओ'' या फोटोमध्ये अनीता पती रोहीतसोबत स्टायलिश अंदाजात बेबी बंम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय.अनिताने तिची प्रेग्नंसी जाहीर केल्यानंतर तिच्या प्रेग्नंसीदरम्यानच्या प्रत्येक अपडेट ती सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत आहे.

 

प्रेग्नंसीमुळे तिच्या चेह-यावरही ग्लो आल्याचे पाहायला मिळतंय. रोहितही अनिताची खूप काळजी घेतोय. प्रेग्नीसदरम्यान तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तिला जास्तीत जास्त खूश ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय.विशेष म्हणजे लग्नाच्या सात वर्षानंतर या कपलच्या आयुष्यात बाळाची एंट्री होणार आहे. बाळाच्या येण्याची चाहुल लागल्यापासून दोघेही आतुरतेने बाळाच्या आगमनाची वाट पाहात आहेत.

मध्यंतरी अनिता हसनंदानीच्या गरोदरपणाबद्दल एका युजरने अनिताला ट्रोल केले आणि लिहिले, "तू 50 वर्षांची होशील तेव्हा तुझा मुलगा 11 वर्षांचा असेन, काय फायदा? त्याला आपल्या आजीसोबत चालतानाही लाज वाटेल....या युजरची ही कमेंट बघून अनेकांचा संताप अनावर झाला. अनिताचा पती रोहित रेड्डीही स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने या ट्रोलरला सणसणीत उत्तर दिले.‘गणित चांगले आहे तुझे, यासाठी तुला टाळ्या मिळायला हव्यात. पण एक गोष्ट तू विसरलास.

 

तिने 20 वर्षे अथक कष्ट करून तिचे करिअर घडवले आणि मुलाचे भविष्य सुरक्षित व्हावे, याचीही काळजी घेतली. या हिशोबाने 50 व्या वर्षीही तिला मुलाची चिंता करत बसावे लागणार नाही,’ असे रोहितने या ट्रोलरला सुनावले.अनिता हसनंदानी सध्या 39 वर्षांची आहे. गेल्या 20 वर्षांपासून ती टीव्ही इंडस्ट्रीत काम करतेय.

अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी २०१३ साली रेशीमगाठीत अडकले होते. दोघांचा प्रेमविवाह होता.अनिता आणि रोहित रेड्डी दोघांची पहिली भेट जीममध्ये झाली होती. दोघेही एकाच जिममध्ये वर्कआउसाठी जायचे. दोघांची मैत्री झाली आणि दोघे एकत्र पब पार्ट्यामध्ये जाऊ लागले. रोहित रेड्डी हा एक व्यावसायिक आहे. अनिता आणि रोहितची जोडी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक क्युट जोडी मानली जाते. दोघांनीही 'नच बलिये'च्या शोमध्येही भाग घेतला होता.

टॅग्स :अनिता हसनंदानी