Join us

'पिंजरा खुबसुरती का' मालिकेत करण वोहराची होणार एंट्री, दबंग एसीपी राघव शास्‍त्रीच्‍या भूमिकेत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 20:28 IST

'पिंजरा खुबसुरती का' रंजक वळणावर आली आहे.राघव मयुराच्‍या प्रेमात खूपच वेडापिसा आहे आणि तो तिचा विश्‍वास जिंकण्‍यासोबत तिला आकर्षून घेण्‍यासाठी काहीही करू शकतो.

छोट्या पडद्यावरील लोक‍प्रिय मालिका 'पिंजरा खुबसुरती का' रंजक वळणावर आली आहे.मालिकेतील सगळेच पात्र रसिकांची भरघोस पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेमधील प्रमुख महिला पात्र मयुराने (रिया शर्माने साकारलेली भूमिका) तिच्‍या जीवनात लांबचा पल्‍ला गाठण्‍यासोबत अनेक आव्‍हानांचा सामना केला आहे, जेथे तिला तिची खरी क्षमता समजली आहे. 

ओमकारला (साहिल उप्‍पलने साकारलेली भूमिका) देखील जीवनाचा धडा मिळाला आहे आणि सौंदर्याबाबत त्‍याच्‍या वेडेपणावर नियंत्रण मिळवले आहे. मयुराप्रती त्‍याची वागणूक देखील बदलली आहे आणि तो आता तिच्‍याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. मालिकेच्‍या चालू एपिसोडमध्‍ये ओमकार विशाखाने दिलेले कोडे सोडवतो आणि ताराला वाचवण्‍यासाठी हवेलीकडे धावत जातो.

 

त्‍यानंतर मयुरा व ओमकार यांच्‍यामध्‍ये गैरसमज निर्माण करण्‍यासाठी विशाखा मयुराला खोटी माहिती सांगते. मयुरा त्‍यावर विश्‍वास ठेवते आणि‍ तिला वाटते की ओमकारनेच ताराला बंदिस्‍त ठेवले होते. तिला सर्व गोष्‍टी तिच्‍यापासून लपवून ठेवलेल्‍या ओमकारचा खूप राग येतो. ती ओमकारवर चिडून ओरडते आणि ताराला हॉस्पिटलला घेऊन जाते.

या नाट्यमध्‍ये घडामोडींमुळे मालिका आता रंजक वळणावर आली आहे.अभिनेता करण वोहरा, जो पोलिस असलेल्‍या राघव शास्‍त्रीची भूमिका साकारणार आहे. राघव जो बालपणापासून मयुरावर प्रेम करतो. मयुराच्‍या जीवनात त्‍याचा प्रवेश ओमकार व मयुरा यांच्‍यामध्‍ये अनेक वादविवाद निर्माण करेल. मालिकेमधील आपल्‍या भूमिकेबाबत बोलताना करण म्‍हणाला, ''मी पोलिस अधिकारी राघव शास्‍त्रीची भूमिका साकारण्‍यास उत्‍सुक आहे, जो सामान्‍य पोलिस नाही. तो अत्‍यंत चिडखोर, दबंग व्‍यक्‍ती आहे, पण मजेशीर देखील आहे. मला अशा भूमिका आवडतात. 

राघव मयुराच्‍या प्रेमात खूपच वेडापिसा आहे आणि तो तिचा विश्‍वास जिंकण्‍यासोबत तिला आकर्षून घेण्‍यासाठी काहीही करू शकतो. मला खात्री आहे की प्रेक्षकांना एक नवीन भूमिका पाहायला मिळेल, जी मी साकारत आहे. मी आशा करतो की, ते माझ्या भूमिकेचे कौतुक करतील. मला विश्‍वास आहे की, राघव निश्चितच ओमकार व मयुराच्‍या जीवनामध्‍ये अनेक ड्रामा निर्माण करेल.''